डोनाल्ड ट्रम्प देतायेत भारत-पाकला धोका’, पाकिस्तानी मंत्र्याचं खळबळजनक ‘वक्‍तव्य’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी गुरुवारी दावा केला की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तान या दोघांची फसवणूक करीत आहेत. रावलपिंडी येथे पत्रकारांशी बोलताना राशिद म्हणाले की पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या कार्यकाळात काश्मीर प्रश्न सोडविला जाईल.

हास्यास्पद भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले मंत्री रशीद म्हणाले की काश्मीरमध्ये जे काही घडले ते मास्टर प्लॅनचा भाग आहे असा एक गट हा प्रचार करीत आहे. मी तुम्हाला सांगतो की ट्रम्प यांनी दोन्ही बाजूंनी हा खेळ खेळला. ते भारत आणि पाकिस्तान या दोघांची फसवणूक करीत आहेत.

व्हाइट हाऊस येथे 22 जुलै रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थ होण्याची ऑफर दिली होती. रशीद म्हणाले की, काश्मिरी लोकांशी एकता दर्शविण्यासाठी समझोता एक्स्प्रेस आणि थार एक्सप्रेस या दोन्ही गाड्या बंद केल्या गेल्या.

फ्रान्समधील जी -7 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी सोमवारी आपली प्रतिक्रिया मागे घेताना म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान स्वत: काश्मीर प्रश्न सोडवू शकतात असा त्यांचा विश्वास आहे.

आरोग्यविषयक वृत्त –