7 वा वेतन आयोग : रेल्वेच्या नोकरदारांना सणापूर्वी दुप्पट ‘बोनस’, 2 वर्षाचे अनुदान देखील मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सण – उत्सव येण्यापूर्वीच रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे सरप्राईझ दिले आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या वर्कशॉप कर्मचाऱ्यांना आणि उत्पादक कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का देत डबल इन्सेन्टिव्ह बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना या सोबतच दोन वर्षांचा एरिअर सुद्धा दिला जाईल. या आधी रेल्वे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे हा बोनस दिला जात नव्हता.  आता हा बोनस वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढवण्यात येत आहे.

इनसेंटिव्ह बोनस १ जुलै पासून सुरु करण्यात येईल, या हिशोबाने कर्मचाऱ्यांना एरिअरची चांगली रक्कम मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना ६,७६० इतका मिळणार बोनस आता १२,१६८ इतका मिळावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

जुलै २०१९ पासून जर भत्ता सुद्धा दिला जाऊ लागला तर तो रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी डबल बोनस ठरणार आहे. यादरम्यान ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की, इनसेंटिव्ह बोनस पुन्हा सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयावर खूप आधी पासून दबाव टाकत होतो. ज्यामध्ये इनसेंटिव्ह बोनस भत्त्यामध्ये बदलण्याची मागणी केली होती.

सरंक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी चाईल्ड केअर लिव्हला मंजुरी दिली आहे मात्र ही मंजुरी भारतीय रक्षा सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –