विना तिकीट रेल्वे स्टेशनवर जाणे होणार ‘मुश्किल’ : एअरपोर्टच्या धर्तीवर नियम लागू करणार रेल्वे प्रशासन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमी आपण रेल्वे स्टेशनवर कोणाला सोडायला गेलो तर त्यांना बसवून बाहेर येत नाही. पण एअर पोर्टवर अस करता येत नाही. बाहेरूनच सोडून जावे लागते. हा नियम सुरक्षतेसाठी केला आहे. आता रेल्वे च्या सुरक्षतेसाठी रेल्वे मंत्रालयानेही काही नियम बनवले आहेत. रेल्वे स्टेशनवरील उगाची गर्दी कमी करण्यासाठी नवे नियम करण्यात आले आहेत. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने काही बदलही करण्यात येणार आहेत.

होणाऱ्या बदलांत एअर पोर्टसारखी एन्ट्री आणि एग्झिट अशा दोन व्यवस्था करण्यात येणार आहेत. १०० दिवसात सर्व स्टेशनवर वायफाय सर्विस आणि ए वन कॅटेगिच्या स्टेशनला आधुनिक बनवणे. या स्टेशनमध्ये सूरत, रायपुर, दिल्ली कैंट आणि रांची या स्टेशनचा समावेश आहे.

रेल्वेचे काही नवीन नियम आणि बदल

१. रेल्वे स्टेशनवर आत आणि बाहेर अशा आधुनिक व्यवस्था करण्यात येणार आहेत.

२. A आणि A1 कॅटेगरिच्या स्टेशनवर अटोमॅटीक गेट लावण्यात येणार आहे.

३. रेल्वे तिकीटाविना रेल्वे स्टेशनच्या आत परवाणगी नसेल.

४. होणाऱ्या नवीन योजना हबीबगंज आणि गांधीनगर या दोन स्टेशनर लागू होतील.

५. मुंबई, दिल्ली या स्टेशनवरही ही व्यवस्था लागू होणार आहे.

६. आरपीएफ कमांडोंना सीआईएसएफ कमांडो सारखे ट्रेनिंग दिले जाणार आहे.

दरम्यान, या होणाऱ्या नव्या बदलांसाठी रेल्वे मंत्रालयाने ११५ कोटी रुपये देणार आहे. तसंच मुंबईची लाईफलाईन रेल्वे आहे. त्यामुळे मुंबईत पावसाळ्याच्या दृष्टीने काही तयारी करण्यात येत आहे. रेल्वे आणि हवामान विभाग यांनी एकत्र येऊन मीरा रोड स्टेशनवर Automatic Rain-Gauge System ची सुवीधा करण्यात आली आहे. तसंच भाईंदर रेल्वे स्टेशनवरही ही सुवीधा करण्यात आली आहे. ज्याने किती पाऊस झाला. किंवा होणारे यावर रेल्वे प्रशासनाचीही नजर असेल. ज्याने रेल्वे रुळांवर पाणी साचल्यास रुट चेंज करण्याचा निर्णय लवकर घेऊ शकतो.