खुशखबर ! ‘दसर्‍या-दिवाळी’साठी प्रवाशांना आरामात मिळेल तिकीट, रेल्वेकडून ‘खास’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेचे कन्फम तिकीट भेटणे रेगुलर दिवशी सुद्धा खूप कठीण जाते त्यातच सुरु होणाऱ्या दिवाळी, नवरात्र, छठ पूजा अशा सणांमुळे रेल्वे गाड्या खचाखच भरून जातात. या सणांच्या दिवशी अनेक जण रेल्वेने प्रवास करून आपल्या गावी जात असतात. प्रवाशाच्या सुविधांसाठी आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वेने विशेष तरतुदी केल्या आहेत.

उत्तर रेल्वे विभागाने २० रेल्वे गाड्यांमध्ये जास्तीचे डबे लावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की, येत्या नवरात्री आणि दिवाळी दरम्यान अनेक लोक प्रवास करून गावी जातात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेची क्षमता वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने केला आहे. यासाठी रेल्वे गाड्यांना जास्तीचे डब्बे लावले जाणार आहेत.यात स्लीपिंग कोचसहित एसी डब्ब्यांचाही समावेश आहे. यामुळे सणासुदीला होणारी गर्दी थोड्या प्रमाणावर कमी होईल.

नवी दिल्ली – अमृतसर स्वर्ण शताब्दी, नवी दिल्ली – दौराई शताब्दी एक्सप्रेस, नवी दिल्ली काठगोदाम शताब्दी एक्स्प्रेस, नवी दिल्ली चंडीगड शताब्दी एक्सप्रेस, एक एक एसी चेअरकार जोडला जाईल. त्याचबरोबर, नवी दिल्ली – डिब्रूगढ़ राजधानी, नवी दिल्ली जम्मू राजधानीमध्ये एसी थर्ड क्लासचा अधिकच डबा जोडण्यात येईल. याशिवाय अनेक गाड्यांमध्ये स्लीपर कोच लावण्यात येणार आहेत.

Visit : Policenama.com