Coronavirus : ‘तिकीट’ रिझर्व्हेशन संदर्भात रेल्वेकडून स्पष्टीकरण, ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आरक्षण’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. रेल्वे सेवा देखील ठप्प आहे. रस्ते वाहतूक देखील काहीच प्रमाणात सुरु आहे. अनेकांनी रेल्वेचे एप्रिल आणि मे महिन्याचे आधीपासूनच आरक्षण करुन ठेवले आहे. परंतु रेल्वे बंद असल्याने ते आरक्षण स्थगित झाले आहे. 14 एप्रिलपर्यंत आरक्षण रद्द करण्यात आलं होतं परंतु रेल्वेने आणखी एक खुशखबर दिली आहे. त्यानुसार 14 एप्रिल पर्यंत रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.

यापूर्वी आरक्षण सुविधा 14 एप्रिलनंतर बंदच ठेवणार असल्याचे अफवा पसरवण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर आता रेल्वेकडून हे स्पष्टीकरण आलेले आहे.

15 एप्रिल या तारखेपासून आरक्षण देण्यास कधीही बंदी नव्हती. 15 एप्रिलपासून आरक्षण करता येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन 14 एप्रिल पर्यंत आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयआरसीटीसी 15 एप्रिलपासून रेल्वे तिकिटांची बुकिंग सुरु करणार असून ही सुविधा अंशता कार्यान्वित होणार आहे. रेल्वेचे वेळापत्रक मात्र पुर्वी प्रमाणे रुळावर येण्यासाठी काही कालावधी लागेल.

सध्याच्या नियमांतर्गत आरक्षणाची सुविधा प्रवासाच्या तारखेच्या 120 दिवस आधी करण्यात येत होती. या नियमानुसार 15 एप्रिल आणि त्यापुढील प्रवासासाठी बुकिंग 120 दिवसआधीच आरक्षित करावी लागणार आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रवासासाठी आरक्षण करता येणार नसल्याची अफवा पसरली होती. त्यात कोणतेही तथ्य नाही. परंतु 14 एप्रिलनंतर ही आरक्षण प्रणाली प्रवाशांसाठी उघडण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊन होण्यापूर्वी 22 मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली होती. परंतु मालवाहतूक गाड्या सामान्यापणे सुरु होत्या. रेल्वे सेवा देखील 15 एप्रिलपासून सुरु होईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही 1 एप्रिलपासून रेल्वेनं देशभरात औषध, आवश्यक घटक, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठीची सेवा सुरु करावी असे आवाहन देखील केले आहे.