×
Homeक्राईम स्टोरीरेल्वेच्या तत्काळ तिकीटाचा काळाबाजार करणारा गजाआड

रेल्वेच्या तत्काळ तिकीटाचा काळाबाजार करणारा गजाआड

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन-रेल्वेच्या तत्काळ आरक्षित तिकीटांचा काळाबाजार केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आशिष विजय रावळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या मिरज आणि कोल्हापूर येथील संयुक्त पथकाने शुक्रवारी (दि.१९) जयसिंगपूर स्थानकात अटक केली.

मिरज येथील सहाय्यक उपनिरीक्षक आर.डी.पाटील, मुकुंद डुबल, मारुती जाधव, कोल्हापूर येथील सहाय्यक उपनिरीक्षक अनिल सरवदे यांनी भाग घेतला होता. रावळ याच्याकडून ३ हजार ४३५ रुपये किंमतीचे रेल्वेचे तत्काळ आरक्षित तिकीट व रोख ४०० रुपये जप्त करण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर रेल्वेचे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण संपले असल्याने तत्काळ आरक्षणसाठी रेल्वे एजंट आता छोट्या स्थानकाकडेही वळले असल्याचे दिसून येते.

कर्जास कंटाळून मल्लाळ येथील शेतकर्‍याची आत्महत्या
जत : तालुक्यातील मल्लाळ येथील शेतकरी गोरख हणमंत काळे (वय- 39) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि.१९) दुपारी तीन वाजता घटना घडली. जतपासून तीन किलोमीटरवर असलेल्या मल्लाळ या गावात ही घटना घडली. गोरख काळे या शेतकर्‍याने द्राक्षबागेसाठी विकास सोसायटीचे कर्ज काढले होते. तर काही मित्रांकडून हात उसने पैसे घेतले होते. त्यांच्यावर चार लाखाचे कर्ज होते.

सध्या दुष्काळी परिस्थिति निर्माण झाल्याने शेती वाया गेली आहे. बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड झाली नव्हती. त्या विवंचनेतून त्यांनी शुक्रवारी दुपारी द्राक्ष बागेवर फवारायचे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत जत पोलीसांत नोंद झाली आहे.

Must Read
Related News