वाल्हा रेल्वे फाटकाच्या रूळ दुरूस्तीचे काम रखडले ; रविवारी दुपारपर्यंत फाटक चालू होणार !

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-मिरज लोहमार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/-०१ रेल्वे रूळाच्या दुरूस्ती, निरीक्षण व ओव्हर आँईलिंगसाठी शुक्रवारी (दि.१) सकाळी सात वाजलेपासून ते शनिवारी (दि..२ )सायंकाळी सात वाजेपर्यंत रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले होते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रेल्वे रूळाचे काम शनिवारी (दि.२) सायंंकाळी सात वाजेेपर्यंत पुर्ण झाले नव्हते. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.

तथापि अपुुऱ्या कामगारां मुुळेे रेल्वे रूळाचे दुरूस्ती चे काम रखडले असल्याचे दिसत होते. वास्तविक ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनाने पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा रोडवरील एकमेव असलेले रेल्वे गेटचे दुरूस्तीचे काम काढल्याने दिवाळीवरून पुणे, मुंबईकडे परतीच्या प्रवासास निघालेल्या प्रवाशांचे आतोनात हाल झाल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या दिरंगाई बाबत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, नीरा – वाल्हा रोडवरील रेल्वे गेट रविवारी (दि. ३) दुपारपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल असे रेल्वेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या