रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ट्रेन ‘लेट’ असेल तर फोनवर येईल SMS, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे कायमच आपल्या प्रवाशांना आरामदायक सुविधा देण्याचा प्रयत्न करते. आता थंडीचे दिवस असल्याने प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याची खास तयारी रेल्वेकडून करण्यात येत आहे. रेल्वे आता प्रवाशांना रेल्वे लेट होणार असेल तर मोबाइलवर मेसेजद्वारे सूचना देणार आहे. याबरोबरच रेल्वे रात्री विशेष पेट्रोलिंग आणि सिग्नलची माहिती पायलेटपर्यंत पोहचवण्यासाठी फॉग सेफ्टी डिव्हाइसची व्यवस्था त्यांच्या व्यवस्थेसाठी करण्यात येणार आहे.

रेल्वेने ई तिकीटशी संबंधित नियम बदलले –
रेल्वेने नुकतेच रेल्वे ई तिकीट संबंधित नियम बदलले आहेत. रेल्वेत अधिकृत एजेंटच्या माध्यमातून ई तिकीट रद्द होण्याच्या व्यवस्थेमध्ये रेल्वेने बदल केले आहेत. रेल्वेद्वारे आता एजेंट द्वारे बुक केले गेलेले ई तिकिट रद्द केल्यानंतर रिफंड ओटीपीवर आधारित असेल. जर सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तिकीट बुकिंगनंतर रेल्वे प्रवासी जर आपले रेल्वे तिकीट किंवा वेटिंग तिकीट रद्द करण्याचा विचार करत असेल तर त्यांना रिफंडच्या रक्कमेबरोबर ओटीपी मेसेज येईल. यानंतर तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना आपल्या अधिकृत एजेंटकडे जाऊन ओटीपी दाखवावा लागेल.

ओटीपीच्या आधारे मिळेल रिफंड –
ई तिकीट रद्द करण्याच्या रिफंडमध्ये ओटीपी आधारित सिस्टम जोडल्यानंतर प्रवाशांना हे जाणून घेणे अत्यंत सोपे होईल की रिफंड किती मिळणार आहे. या बदलानंतर तिकीट रद्द करणे आणि वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना मोबाइलवर तिकीटाची रक्कम आणि ओटीपी पाठवण्यात येईल. याच ओटीपीला दाखवून प्रवासी आपल्या अधिकृत एजेंटकडून रिफंड मिळवू शकतात.

Visit : Policenama.com