रेल्वे तिकीट बुक करणार्‍यांना बसू शकतो ‘झटका’, IRCTC नं दिला ‘अलर्ट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन रेल्वे तिकिट बुक करणार असाल तर तुमच्यासाठी IRCTC ने एक अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट त्या लोकांसाठी आहे जे रेल्वे प्रवासादरम्यान माहितीसाठी किंवा तक्रारीसीठी सोशल मीडियाचा वापर करतात. IRCTC च्या या अलर्टकडे तुम्ही दुर्लक्ष करत असतात तर त्याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल.

IRCTC कडून ट्विटवर अनेक ट्विट केले गेले, त्यानुसार त्या यूजर्सला टारगेट केले गेले जे तक्रारीसाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर मोबाइल नंबर, पीएनआर आणि ट्रांजेक्शन आयडी सारखी खासगी माहिती देतात. अशा यूजर्सबरोबर बँकिंग फ्रॉड केले जाऊ शकते. IRCTC ने ही माहिती लोकांनी सोशल मीडियावर शेअर करु नये असे आवाहन केले आहे.

याशिवाय IRCTC ने सांगितले की भारतीय रेल्वे फक्त थेट मेसेजद्वारे माहिती मागवून घेते, त्यांनी हे स्पष्ट केले की आयआरसीटीसीची रिफंड प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॉटिक आहे आणि यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.

जर तुम्ही आयआरसीटीसीवरुन तिकीट रद्द करतात तेव्हा तुम्हाला रिफंडच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणत्याही इतर मदतीची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मेसेज, कॉलपासून सावध रहा कारण हे मेसेज किंवा कॉल तुमचे खाते रिकामे करु शकते.