खूशखबर ! रेल्वेने लॉन्च केलं ‘iMudra’ प्रीपेड कार्ड, आता ‘तिकिट’ मिळणं ‘आधिक’ सोपं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही रेल्वेने कायमच प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेने खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे तुमचा रेल्वेचा प्रवास तिकीट घेण्यापासूनच सोपा होईल. आता प्रवासी iMudra या कार्ड द्वारे आपले तिकिट खरेदी करु शकतात. आता भारतीय रेल्वेने डिजिटल पेमेंटला प्रोस्ताहन देण्यासाठी IRCTC च्या माध्यामातून आपले पहिल्या प्रीपेड कार्डसह iMudra ची घोषणा केली आहे. सामान्य लोकांना प्रवास करताना याच फायदा व्हावा म्हणून हे कार्ड लॉन्च केले आहे.

या कार्डचा वापर फक्त रेल्वे तिकिटासाठी नाही. तर इतर खरेदीसाठी देखील केला जाऊ शकतो. नुकत्याच आलेल्या एसोचैम – पीडब्लू सी च्या भारतातील एका अध्ययनानुसार, भारताच्या २०१९ – २०२३ च्या दरम्यान डिजिटल व्यवहारात वाढ होणार आहे.

या साठी वापरता येईल कार्ड –

या कार्डच्या माध्यमातून प्रवासी रेल्वे तिकिट, पर्यटन, विमान तिकीट, ऑनलाइन वस्तू आणि सेवांची खरेदी करु शकतात. याचा वापर पीओएस मशीन, ऑनलाइन ट्रांजेक्शन आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी केला जाऊ शकतो. आयआरसीटीसी या कार्डचा प्रयोग वाढवण्यासाठी सरकार नव्या योजना आणण्याच्या तयारीत आहेत. जेणे करुन प्रवासात याचा उपयोग वाढेल आणि डिजिटल पेमेंटला प्रोस्ताहन मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त