Railway Luggage Rules | एक प्रवाशी आपल्यासोबत किती सामान घेऊन जाऊ शकतो? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Railway Luggage Rules | रेल्वेला भारताची लाईफलाईन (Indian Railways) म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक ट्रेनने प्रवास करतात. भारतीय रेल्वेने प्रत्येक गोष्टीचे नियम ठरवले आहेत. ट्रेनमधून नेण्यात येणार्‍या सामानासाठी (Railway Luggage) सुद्धा एक नियम आहे. मात्र, अनेक लोकांना हा नियम माहित नाही की, रेल्वे प्रवासात आपण किती वजनाचे सामान घेऊन जाऊ शकतो. (Railway Luggage Rules)

 

सामानाबाबत काय आहेत रेल्वे नियम (Railway Luggage Rules)

रेल्वे प्रवासात एक प्रवाशी आपल्यासोबत कमाल 50 किलोग्रॅम पर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो. यापेक्षा जास्त सामान असल्यास त्या सामानाचे सुद्धा भाडे द्यावे लागते.

मात्र, एसी कोचमधून प्रवास करणारे प्रवाशी आपल्यासोबत कोणत्याही शुल्काशिवाय 70 किलो सामान घेऊन जाऊ शकतात.

स्लीपर क्लासमधून प्रवास करताना सोबत 40 किलोग्रॅम पर्यंत सामान बाळगू शकतो. (Railway Luggage Rules)

 

रूग्णांसाठी वेगळा नियम
रेल्वे प्रवासात (Train Journey) मोठ्या आकाराचे सामान घेऊन जाणार्‍या लोकांना किमान 30 रुपये भरावे लागतात. ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सामान असेल तर दिडपट जास्त चार्ज द्यावा लागतो.

 

अनेकदा लोक रूग्णासोबत प्रवास करतात अशावेळी त्यांच्या आवश्यक सामानाबाबत रेल्वेचे वेगळे नियम आहेत. या अंतर्गत डॉक्टरांचया सल्ल्याने रूग्ण आपल्यासोबत ऑक्सीजन सिलेंडर आणि स्टँड घेऊन जाऊ शकतो.

 

रेल्वेतून काय घेऊन जाऊ शकत नाही
रेल्वे बोर्डानुसार (Railway Board), रेल्वे प्रवासात स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी नाही. सोबतच शुल्क भरल्यानंतर सुद्धा तुम्ही कमाल 100 किलोग्रॅम पर्यंतच सामान आपल्या सोबत घेऊन जाऊ शकता.

 

Web Title :- Railway Luggage Rules | how much luggage is allowed in train know in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | अखेर ओमायक्रॉनचा धारावीत शिरकाव, आरोग्य यंत्रणा सतर्क; मौलवीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Gold Price Today | चांदीमध्ये मोठी घसरण, सोने 47 हजाराच्या पुढे; जाणून घ्या आजचे नवीन दर

DPDC Meeting Pune | पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय ! 793 कोटी 86 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता (व्हिडीओ)