रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा ‘असा’ही विक्रम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आचारसंहितेपूर्वी उद्घाटने, पायाभरणीचा धडाका लावा असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्री आणि खासदारांना दिला आहे. त्याचे पालन करताना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा विक्रमच केला. चक्क ज्या ठिकाणी रेल्वे मार्गच नाही अशा ठिकाणी पॅसेंजर धावणार असल्याची घोषणा मुंबईत केली.

मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन रविवारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केले. यावेळी त्यांनी अलिबाग ते पेण दरम्यान नवीन पॅसेजर ट्रेन सुुरु करण्याचा विचार असल्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील कार्यक्रमात त्यांनी हे सांगितल्यानंतर उपस्थितांनी अपेक्षेप्रमाणे टाळ्या वाजविल्या. त्यामुळे मंत्रीही खुश झाले. ज्या रेल्वे अधिकाऱ्यांना नेमके वास्तव माहिती होते, त्यांना मात्र घाम फुटला. कारणही तसेच होते. कारण रेल्वे मंत्री ज्या रेल्वेमार्गावर पॅसेजर सुरु करण्याचा विचार करीत होते. तो रेल्वेमार्ग अद्याप अस्तित्वातच आलेला नाही.

पेण ते अलिबाग दरम्यान २९ किलोमीटरचे अंतर आहे. अलिबागला रेल्वे यावी यासाठी अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अलिबागला येऊन पहाणीही केली होती. रेल्वे मंत्रालयाने या मार्गाला मान्यता दिली असली तरी या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. पण पेण -अलिबाग रेल्वे मार्गाच्या भूमी संपादनासाठी अजून शासनाकडून कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. भू संपादनानंतर मार्गासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद करावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वेमार्ग टाकण्याचे काम सुरु होऊ शकेल. त्याला किती काळ लागेल, याची कोणालाही काही कल्पना नाही. स्वर्गीय अ‍ॅड. खानविलकर हे गेले अनेक वर्षे या मार्गासाठी पाठपुरावा करीत होते. तरीही गेल्या पाच वर्षानंतरही या रेल्वे मार्गाचे काम थोडेही पुढे सरकले नाही. असे असताना रेल्वेमंत्र्यांनी मात्र या मार्गावरुन पॅसेंजर गाडी सुरु करण्याचा विचार असल्याचे जाहीर करुन निवडणुकीच्या तोंडावर कशा फसव्या घोषणा देत आहोत, याची चुणकच दाखवून दिली आहे.

ह्याही बातम्या वाचा –

आ. कांबळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे 

‘..तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर कला सादर करू’ 

विद्यार्थ्याच्या खिशात कॉपी ऐवजी सापडले ‘हे’ पत्र 

खुशखबर : कर्मचाऱ्यांना यंदा ९.७ टक्क्यांनी पगारवाढ 

“हिंमत असेल तर माढ्यातून लढाच”, पवारांचं खुलं आव्हान