रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झाला नाही ; रेल्वेमंत्री

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चिघळल्यानंतर रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जेवण आणि पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यासंबंधी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सगळ्या आरोपांना उत्तर दिली आहेत. यात एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

कोरोनामुळे केंद्र सरकारने देशात लॉकडाउन लागू केला. 21 दिवसांच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे देशभरात विविध राज्यात काम करत असणार्‍या मजुरांनी घराकडे स्थलांतर करण्यास सुरूवात केली. पायीच घरी जाणार्‍या अनेक मजुरांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. या गाड्यांमध्ये 80 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. रेल्वेसंदर्भात होत असलेल्या आरोपांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिली आहेत. गोयल यांनी ट्विट करून देशात कोणत्याही रेल्वेगाडीला पोहोचण्यासाठी 7 किंवा 9 दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यान झालेला नाही. रेल्वे प्रवाशांना 1.9 कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळविण्यात आल्या. ज्याचे प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत 1.75 टक्के इतके आहे. 10 दिवसांमध्ये रेल्वेगाड्यांमध्ये 80 मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like