रेल्वेची खास योजना ! रिकाम्या बाटल्यांचे तुम्हाला मिळणार ‘इतके’ रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने नवीन अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे स्थानकांवर, रेल्वेच्या डब्ब्यात असणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून यापुढे टी-शर्ट आणि टोप्या बनवण्यात येणार आहेत. यासाठी बाटल्या एकत्रित करण्यासाठी रेल्वेने अनोखी कल्पना काढली आहे. यामध्ये तुम्ही रिकामी प्लॅस्टिकची बाटली दिल्यास तुम्हाला प्रत्येक बाटलीचे पाच रुपये मिळणार आहेत. रेल्वेच्या या पावलामुळे पर्यावरणाचे देखील सरंक्षण होणार आहे.

या चार स्थानकांवर लावली जाणार वेंडिंग मशीन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या पटना जंक्शन, राजेंद्रनगर, पटना साहिब आणि दानापुर या चार स्थानकांवर वेंडिंग मशीन लावली आहेत. ज्याद्वारे पाण्याच्या बाटल्यांपासून टी-शर्ट आणि टोप्या बनवल्या जाणार आहेत. रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या मशीनमधील प्लास्टिकचा उपयोग करून हे बनवले जाणार आहेत.

मुंबईची एक कंपनी बनवणार टी-शर्ट

बनवण्यात येणारे टी- शर्ट सर्व ऋतूंमध्ये वापरात येऊ शकतात. हे टी-शर्ट बनवण्यासाठी रेल्वेने मुंबईच्या एका कंपनीबरोबर करार केला आहे. लवकरच या प्लस्टिकपासून तयार झालेले टी-शर्ट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

बाटली देताच मिळणार व्हाउचर

प्रवाशांना या बाटलीचे पाच रुपये मिळणार आहेत. हे पाच रुपये त्यांना व्हाऊचरच्या रूपात मिळणार आहेत. या व्हाऊचरच्या मदतीने तुम्ही निवडक दुकानात आणि मॉलमध्ये खरेदी करू शकता. मशीनमध्ये बाटली टाकण्याच्यावेळी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देखील टाकावा लागणार आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला धन्यवादच्या संदेशासह संबंधित मूल्याचे व्हाउचर देखील मिळणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –