Railway New Rules on Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Railway New Rules on Corona | रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Passengers) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) पुन्हा एकदा मास्कचा (Mask) वापर बंधनकारक केला आहे. मागच्या कोरोनाच्या महामारीत सर्वच सार्वजनिक तसेच खासगी वाहनातून प्रवास करताना मास्क अनिवार्य केले होते. त्यानंतर राज्यातील काही राज्य सरकारने मास्क सक्तीचं बंधने हटवले. आता पुन्हा एकदा प्रवासादरम्यान मास्कची सक्ती (Railway New Rules on Corona) करण्यात आली आहे.

 

“रेल्वे प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोना प्रोटोकॉलचे (Corona Protocol) पालन करण्यात यावे, असं रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा (Neeraj Sharma) यांनी पत्रकातून सांगितलं. तसेच, नीरज शर्मा यांनी सर्व झोनच्या चीफ कमर्शियल मॅनेजर्सना (CCM) पत्र पाठवून याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. (Railway New Rules on Corona)

केंद्रीय गृह मंत्रालय (Union Ministry of Home Affairs) आणि आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) कोरोनाबाबत, 22 मार्च रोजी जारी केलेल्या एसओपीचे पालन करण्यात यावे.
तसेच, विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते.
रेल्वे बोर्डाने सर्व गाड्या आणि स्थानक परिसरांतही प्रवाशांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं.

 

कोरोना नियंत्रणात आल्याने रेल्वे प्रशासनाने मास्क वरील बंधने हटवले होती.
आता पुन्हा एकदा कोरोनावरील नियमाचे पालन करावे लागणार आहे.
कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वेने प्रवासादरम्यान पुन्हा एकदा मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.

 

Web Title :- Railway New Rules on Corona | corona guideline important news for the train passengers railway make mandatory to wear mask in railway travel

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा