रेल्वेमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 2590 जागांसाठी भरती, लेखी परिक्षा नाही, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. ही संधी पूर्वोत्तर सीमांत रेल्वेत आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2019 आहे.

पदांचे नाव – अ‍ॅक्ट अपरेंटिस

पदांची संख्या – 2590

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2019 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

वयोमर्यादा –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वय असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक योग्यता –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 पास असणे आवश्यक आहे, किंवा 10 + 2 पास असावेे. त्यात एकूण 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया –
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला https://nfr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यावर नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी अर्ज भरावा.

निवड प्रक्रिया –
उमेदवारीची निवड मेरिटच्या आधारे करण्यात येईल.

Visit : Policenama.com