सावधान ! ‘महाग’ होणार रेल्वेचं ‘ई-तिकिट’, ‘हे’ अतिरिक्त शुल्क लगणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाा – तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर न जाता थेट रेल्वेच्या अॅपवरुन ई रेल्वे तिकिट सतत काढत असाल तर तुमचा प्रवास लवकर महाग होऊ शकतो. कारण रेल्वेने ई – तिकिटावर लागणारा सर्व्हिस चार्ज पुन्हा एकदा लागू केला आहे. हाच सर्व्हिस चार्ज म्हणजेच सेवा शुल्क डिजिटल ट्रांजेक्शन वाढवण्यासाठी २०१६ मध्ये रद्द करण्यात आला होता.

ई – तिकिटांवर भारतीय रेल्वे सेवा शुल्क आकारत होते. यात स्लीपर क्लासच्या तिकीटावर २० रुपये आणि एसी डब्यासाठी ४० रुपये होता. नोटाबंदीनंतर डिजिटल ट्रांजेक्शनला प्रोस्ताहन देण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर हे शुक्ल रद्द करण्यात आले होते. अर्थ मंत्रालयाने हे शुल्क रद्द केल्यानंतर रेल्वेवर पडणारे ओझे सांभाळण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिेले होते.

पुन्हा वाढवणार सेवा शुल्क –
परंतू नंतर अर्थमंत्रालयाने हा निधी देण्यास नकार दिल्यानंतर आता रेल्वेने हे शुल्क पुन्हा आकारण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे बोर्ड चे जाईंट डायरेक्टर ट्राफिक कमर्शल बीएस किरण यांनी पुन्हा एकदा सेवा शुल्क आकरण्याचे स्पष्ट केले आहे.

सुरुवातीला जून २०१७ पर्यंत सेवा शुल्क वसूल करण्याची मर्यादा ठरवण्यात आली होती. यानंतर या मर्यादेला काही कालावधीसाठी वाढवण्यात आले आणि आतापर्यंत ही सीमा वाढवून सेवा शुल्क वाढवण्यात आले नव्हते. परंतू हे सेवा शुल्क न आकारण्यात आल्याने आयआरसीटीसीच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. रेल्वेच्या एकूण उत्पन्नात सेवा शुल्काचे कायमच महत्वाचे योगदान राहिले आहे.

रेल्वेत मिळणाऱ्या जेवणाच्यास सुविधेची किंमत देखील वाढणार –
शताब्दी, राजधानी आणि दुरांतो यात मिळणारे जेवण आणि इतर खाद्या पदार्थांचे दर देखील वाढणार आहे. आयआरसीटीसीने रेल्वे बोर्डाकडून यासाठी परवानगी मागितली आहे. याला मंजूरी मिळाल्यानंतर या नव्या किंमती लागू होतील. किंमती वाढल्याने अन्नाच्या दर्जात देखील सुधारणा होईल. आता या मिळणाऱ्या जेवणाची किंमत ११२ रुपये आहे तर रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हेच जेवण आता १५० रुपये होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त