Railway Police | CSMT, कुर्ला रेल्वे स्थानकासह चार ठिकाणी आत्मघाती हल्ला करण्याचा फोन; जबलपूरच्या तरुणाला केली अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) दक्षिण प्रादेशिक विभाग नियंत्रण कक्षाला (Control Room) आलेल्या आत्मघाती हल्ल्याच्या (Suicide Attack) फोनने सर्वत्र खळबळ उडाली आहे. लोहमार्ग पोलीस (Railway Police) आणि आरपीएफने श्वान पथकाच्या (RPF Dog Squad) मदतीने सीएसएमटी (CSMT), कुर्ला रेल्वे स्थानकासह (Kurla Railway Station) चार ठिकाणांवर सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरू केले. या मोहिमेसाठी तब्बल 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कामाला लागला होता. मात्र, ही अफवा असल्याचे समोर येताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

 

दरम्यान, शुक्रवारी रात्री जबलपूरच्या गडा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी (Gada Police Station, Jabalpur) हल्ला करण्याचा फोन करणाऱ्या जितेश ठाकूर (Jitesh Thakur) याला ताब्यात (Arrest) घेतले आहे.

 

जबलपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोपाल खंडेल (Addl SP Gopal Khandel) म्हणाले की, जितेश ठाकुरला अटक करण्यात यश आले आहे.
तो एक बेरोजगार (Unemployed) असून त्याने केलेलं कृत्य नशेत (Drug) असताना केले का? याची पडताळणी सुरू आहे.
ठाकुरने रेल्वे स्थानकासह नवी मुंबईतील गुरुद्वारा (Gurudwara in Navi Mumbai) आणि अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) वरही आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिली होती.

 

हल्ल्याची धमकी दिल्यानंतर रेल्वे स्थानकातील गर्दी पाहता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त कैसर खालीद (CP Kaiser Khalid) यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 200 अधिकाऱ्यांनी रात्रभर सर्च ऑपरेशन केले.
जेव्हा ही अफवा असल्याचे उघड झाले तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.
परंतु पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरूच ठेवली.
कोणती संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती याठिकाणी दिसते का, याचा शोध घेत होते.
तसेच या दोन्ही ठिकाणाहून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या तसेच प्रवाशांच्या सामानाचीदेखील पडताळणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, जितेश ठाकुरला मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या (Railway Police) ताब्यात दिले जाणार आहे.

 

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे (CSMT Lohmarg Police Station) पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार (Police Inspector Mehboob Inamdar) म्हणाले, जितेश ठाकुरला अटक केल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे.
नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम त्याने केले आहे.
त्याच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात येणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

 

Web Title :-  Railway Police | unemployed drug addicts gave threaten call railway station CSMT Kurla

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 4000 पेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nude Photography | ‘न्यूड फोटोग्राफी’ ही कला नाही का? पुण्यातील ‘बालगंधर्व’मध्ये प्रदर्शन भरवल्यावर तरुणाला आंदोलनाची धमकी

 

Modi Government | मोदी सरकारकडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ! साखर कारखान्यांचा 8 हजार 400 कोटींचा प्राप्तिकर माफ