Lockdown : रेल्वेनं राज्यांना दिली मोठी ऑफर ! फक्त 15 रूपयांमध्ये उपलब्ध करून घ्या ‘भोजन’ पॅकेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस विरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात भारतीय रेल्वेही मदत करणार असून रेल्वे मंत्रालयाने राज्यांना देशभरात असलेल्या रेल्वे किचनमधून दररोज २.६ लाख फूड पॅकेट देण्याची ऑफर दिली आहे. फूड पॅकेट १५ रुपये दराने उपलब्ध असेल. रेल्वेने राज्यांना पैसे नंतर देण्याची सुविधा दिली आहे.

रेल्वे किचनमधून मिळणार जेवण
३ मे पर्यंत देशात पूर्णपणे लॉकडाऊन असून अशा परिस्थितीत गरीब आणि गरजू लोकांना अन्न पुरवण्यासाठी रेल्वे पहिल्यापासूनच प्रयत्न करत आहे. देशातील प्रत्येक भागात आवश्यक वस्तू मिळू शकेल म्हणून रेल्वे पार्सल विशेष गाड्या चालवत आहे. रेल्वेने आपल्या विविध किचनमधून दररोज २.६ लाख फूड पॅकेट सर्व जिल्ह्यात देण्याची ऑफर दिली, जिथे लॉकडाऊनमुळे गरजूंना वाटण्यासाठी जेवण देण्यास तयार असतील. मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की, या संदर्भात देशभरातील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे.

१५ रुपयात मिळणार फूड पॅकेट
मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे की, मंडळानुसार स्वयंपाकाचा तपशील राज्यांना देण्यात आला आहे. दररोज २.६ लाख फूड पॅकेट नियुक्त केलेल्या जागांच्या स्वयंपाकघर क्षमतेचा विचार करून देण्यात आले असून आवश्यकतेनुसार पुरवठा वाढवण्यासाठी आणखी स्वयंपाकघरांचा वापर केला जाईल. फूड पॅकेट १५ रुपये दराने उपलब्ध असेल.

हे पैसे राज्य सरकारकडून नंतर घेण्यात येणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यांना अन्नाच्या अतिरिक्त मागणीचेही पैसे द्यावे लागणार आहेत.

रेल्वेने आतापर्यंत २० लाख पेक्षा जास्त फूड पॅकेट वाटले भारतीय रेल्वेने २०.५ लाखाहून अधिक ताजे शिजवलेले जेवण देशभरात अडकलेल्या लोकांना, दैनंदिन वेतन मजुर, स्थलांतरित आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या इतर लोकांना दिले आहे.