रेल्वे भरती 2020 : मॉर्डन रेल्वे कोच फॅक्टरीत बंपर भरती, 10 वी च्या मार्क्सद्वारे होणार निवड, नाही होणार कोणतीही परीक्षा

नवी दिल्ली : यूपीमध्ये रायबरेली येथील मॉर्डन रेल्वे कोच फॅक्टरीत अप्रेंटीसच्या 110 व्हॅकन्सी निघाल्या आहेत. यामध्ये फिटरची 55, इलेक्ट्रिशियनची 35 आणि वेल्डरची 20 पदे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2020 आहे. इच्छुक उमेदवारांनी mcf.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांची निवड 10वीच्या मार्क्सच्या आधारे होणार आहे. परीक्षा आणि इंटरव्ह्यू होणार नाही.

पात्रता
किमान 50 टक्के गुणांसह 10वी पास आणि ट्रेडमध्ये आयटीआय.

वयोमर्यादा
15 ते 24 वर्ष (वयाचा हिशेब 1 डिसेंबर 2020पासून केला जाईल)
एससी, एसटी वर्गासाठी वयात पाच आणि ओबीसीला तीन वर्षांची सूट मिळेल.

अर्ज शुल्क – 100 रुपये
एससी, एसटी, दिव्यांग, ईडब्ल्यूएस व महिला वर्गासाठी शुल्क नाही.

निवड
परीक्षा होणार नाही. 10वीच्या मार्क्सच्या आधारे निवड होईल. 10वीच्या मार्क्सआधारे मेरिट तयार होईल. जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांचे मार्क्स समान असतील तर जास्त वय असलेल्यास प्राधान्य दिले जाईल.

मेरिट लिस्ट 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020च्या दरम्यान जारी केली जाईल.

ऑनलाइन अर्ज करातना हे डॉक्यूमेंट्स अपलोड करावे लागतीली
– जन्मतारखेसाठी 10वीचे सर्टिफिकेट
– 10वीची मार्कशीट, आयटीआय सर्टिफिकेट
– जर उमेदवार एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग कॅटेगरीतून असेत तर त्याचे प्रमाणपत्र

* संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.mcfrecruitment.in/images/MCF_Notification_2020.pdf

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Home