Railway Recruitment 2021 : कोरोना ड्यूटीसाठी थेट ऑनलाइन इंटरव्ह्यूने होईल भरती, सॅलरी 75,000 महिना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   साऊथर्न रेल्वेने फुल टाइम कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर पदावर पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांना रेल्वे हॉस्पिटल, पेरंबूर चेन्नईमध्ये कोविड 19 वार्डमध्ये ड्यूटीवर ठेवले जाईल. उमेदवारांची भरती कॉन्ट्रॅक्ट आधारावर असेल. भरती थेट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होईल आणि निवड झालेल्या उमेदवाराला लवकरच पोस्टींग मिळेल. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे जी उमेदवार sr.indianrailways.gov.in वर व्हिजिट करून डाऊनलोड करू शकतात.

पदांची माहिती आणि आवश्यक पात्रता

एकुण 33 जीडीएमओ पदांवर योग्य उमेदवारांची भरती केली जाईल ज्यामध्ये 17 पदे खुल्या वर्गासाठी, 09 ओबीसी, 05 एससी तसेच 02 एसटी कॅटेगरीसाठी आहेत. नोटिफिकेशननुसार, एमबीबीएस डिग्री धारक ते उमेदवार ज्यांना आयसीयू आणि व्हेंटिलेटरसह काम करण्याचा अनुभव असावा, किंवा डिग्रीसह एक वर्षाचा अनुभव असावा, तेच या पदावर भरतीसाठी पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 75,000 रुपयांचे मासिक वेतन दिले जाईल.

कमाल वयोमर्यादा 53 वर्ष आहे, ज्यामध्ये कॅटगरीनुसार सवलतीची तरतूद आहे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशनसह दिलेला फॉर्म भरून त्याच्या स्कॅन कॉपीसह आपले सर्व कागदपत्र ईमेल अ‍ॅड्रेसवर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2021 आहे. ज्या उमेदवारांचा अर्ज शॉर्टलिस्ट केला जाईल, त्यांना ऑनलाइन अथवा टेलिफोनिक इंटरव्ह्यूसाठी संपर्क केला जाईल. इंटरव्ह्यू 28 एप्रिलपासून होतील. उमेदवारांना जॉयनिंगच्या पूर्वी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा देणे आवश्यक आहे. इतर सर्व माहिती आणि अ‍ॅप्लिकेशन फॉर्म उमेदवार अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पाहू शकतात.

अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

https://sr.indianrailways.gov.in/cris//uploads/files/1618477443100-CMP%20Notification%20for%20uploading.pdf