Railway Apprentice : रेल्वेत मोठी भरती, आजच करा अर्ज, 10 वी पास असणाऱ्यांना संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय रेल्वेने बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) मध्ये ITI किंवा नॉन ITI ऍप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार 374 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट blwactapprentice.in वर जाऊन अर्ज करू शकता. याशिवाय अधिक माहिती वेबसाईटवर जाऊन घेता येऊ शकते. Railway BLW Apprentice 2021 अंतर्गत एप्रेंटिसशिपच्या एकूण 374 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ज्यामध्ये एप्रेंडिस ITI च्या पदांसाठी 300 आहे. तर एप्रेंटिस नॉन-ITI पदांची संख्या 74 आहे.

शैक्षिणक पात्रता

ऍप्रेंटिस ITI च्या 300 पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान 50 टक्के गुणांसह 10 वी पास गरजेचे आहे. तसेच ITI पास असणे गरजेचे आहे. याशिवाय ऍप्रेंटिस नॉन ITI साठी 50 टक्के गुणांसह 10 वी पास असणे गरजेचे आहे. पण या सर्वांना ITI सर्टिफिकेट गरजेचे नाही.

वयोमर्यादा –

ऍप्रेंटिस ITI पदांसाठी 15 ते 24 वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. तर वेल्डर आणि कारपेंटर या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 22 वर्षांचा असावा.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी, 2021
अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी, 2021
डॉक्युमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी, 2021