Railway Recruitment 2021 | 10 वी पास असणार्‍या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 3366 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Railway Recruitment 2021 | रेल्वे भरती सेलकडून पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी (Apprenticeship training) मेगा भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. रेल्वेच्या हावडा, सियालदाह, आसनसोल, मालदा, कांचरापारा, लिलुआ आणि जमालपूर विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या तब्बल 3366 जागांसाठी ही (Railway Recruitment 2021) भरती घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे.

पदे – एकूण जागा – 3366

– हावडा विभाग – 659 पदे

– सियालदाह विभाग – 1123 पदे

– आसनसोल विभाग – 412 पदे

– मालदा विभाग – 100 पदे

– कांचरापारा विभाग – 190 पदे

– लिलुआ विभाग – 204 पदे

– जमालपूर विभाग – 678 पदे

शैक्षणिक पात्रता –

– उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता उत्तीर्ण असावे. यासह,

– तसेच, उमेदवाराकडे NCVT / SCVT द्वारे जारी केलेले ट्रेड सर्टिफिकेट देखील असावे.

वयाची अट –

– किमान 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावे.

निवड प्रक्रिया –

– पात्रतेच्या आधारे अप्रेंटिसशिप ट्रेनीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. (Railway Recruitment 2021)

सविस्तर माहितीसाठी – https://139.99.53.236:8443/rrcer/NOTIFICATION%20ACT%20APPRENTICE%202020-21.pdf

अर्ज करण्यासाठी –  www.rrcer.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  4 ऑक्टोबरपासून ते 3 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

Application fee –  सामान्य श्रेणीच्या (ओपन) उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, SC/ ST/ PWBD/ महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य.

 

Web Title : Railway Recruitment 2021 | Golden opportunity for government job for 10th pass candidates! Mega recruitment for 3366 posts; Learn the process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price | सणासुदीत सुवर्णसंधी? सप्टेंबरमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी उतरलं सोनं

MP Amol Kolhe | ‘पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’ – खा. अमोल कोल्हे

National Flag | अभिमान दिन ! गांधी जयंतीनिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण, मुंबईतील कंपनीने बनवला ‘ध्वज’