Railway Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत GDMO पदांसाठी भरती; पगार 95 हजार रुपये

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Railway Recruitment 2021 | पूर्व मध्य रेल्वेकडून जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) पदांसाठी लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या थेट भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी (Railway Recruitment 2021) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

पदे –

– ऑर्थोपेडिस्ट – 2

– फिजिशियन – 2

– जीडीएमओ – 2

 

शिक्षण आणि अनुभव –

– ऑर्थोपेडिस्ट : एमएस किंवा डीएनबी, डी किंवा ऑर्थो नसल्यास एमएस/जनरल यांना प्राधान्य दिलं जाईल. तसेच GDMO ला 2 वर्षांपेक्षा जास्त शस्त्रक्रियेचा अनुभव असणं आवश्यक आहे. यासाठी MD/मेडिसिन, ICU/ट्रॉमाला प्राधान्य दिलं जाईल. (Railway Recruitment 2021)

– फिजिशियन : MD/मेडिसिन किंवा DNB/मेडिसिन नसल्यास जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरांना ICU/ट्रॉमामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा.

– GDMO : ICU/ ट्रॉमामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या MBBS उमेदवाराला प्राधान्य राहिलं.

वयाची अट – वय 5 नोव्हेंबर 2021 रोजी 53 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.

वेतन –
– फिजिशियन – 95000 रुपये प्रति महिना

– जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – 75000 रुपये प्रति महिना

वॉक-इन मुलाखत –
पूर्व मध्य रेल्वे 22 नोव्हेंबर 2021 रोजी ऑर्थोपेडिस्ट, फिजिशियन आणि GDMO या पदांच्या भरतीसाठी वॉक-इन (Railway walk-in interview) मुलाखत घेईल. ही मुलाखत सेंट्रल कम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल/ECR/पाटणा येथे होणार आहे. या मुलाखतीच्या तारखेला सकाळी 10.00 वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रं दिलेल्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे. (Railway Recruitment 2021)

सविस्तर माहितीसाठी – ecr.indianrailways.gov.in

 

Web Title :- Railway Recruitment 2021 | railway recruitment 2021 for medical officers pots salary up to 95000 rs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik | ज्ञानदेव वानखेडेंच्या दाव्यावर उद्या सुनावणी; नवाब मलिकांनी उच्च न्यायालयाला केली ‘ही’ विनंती

Akshara Singh | स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक शॉट्समध्ये अभिनेत्री अक्षरा सिंहनं केली फ्लॉन्ट फिगर, व्हिडीओ पाहून उडतील होश

Maharashtra Rains | आगामी 5 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ 13 जिल्ह्यांना हाय ‘Alert’

Parambir Singh Absconding | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह तिघांना कोर्टानं केलं फरार घोषित

Thick Thighs-Round Buttocks | मोठ्या मांड्या आणि नाशपती आकारासारख्या लोकांच्या आरोग्यासंबंधी मोठे रहस्य आले समोर; जाणून घ्या

Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचे नवीन दर