रेल्वे भरती 2021 : 10 वी पाससाठी विना परीक्षा 3322 जागांसाठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण रेल्वेने ट्रेड अप्रेंटीसच्या एकुण 3322 व्हॅकन्सी vacancy काढल्या आहेत. या नियुक्त्या फिटर, वेल्डर, पेंटरसह विविध ट्रेड्ससाठी केल्या जातील. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे. अप्रेंटीसच्या या भरतीसाठी कोणतीही परीक्षा आणि इंटरव्ह्यू होणार नाही. ही भरती vacancy इयत्ता 10 वी आणि आयटीआय कोर्समध्ये प्राप्त मार्क्सच्या आधारावर होईल. दोन्हीच्या मार्कांना समान महत्व दिले जाईल. या मार्कांवर मेरिट लिस्ट बनेल आणि मेरिटच्या आधारावर उमेदवारांची निवड होईल. इच्छूक उमेदवारांनी www.sr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत. लक्षात ठेवा या भरतीसाठी डिप्लोमा आणि डिग्री प्राप्त उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

* फिटर, पेंटर, वेल्डर, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (रेडियोलॉजी, पॅथोलॉजी, कार्डियोलॉजी) कॅटेगरीमध्ये अप्रेंटीसशिपसाठी केवळ 10 वी – 12 वी पाससुद्धा अर्ज करू शकतात.

पात्रता :
फ्रेशर्ससाठी
* फिटर, पेंटर, वेल्डर- किमान 50 टक्के गुणांसह 10वी पास.
* मेडिकल लॅबोरेट्री टेक्निशियन (रेडियोलॉजी, पाथोलॉजी, कार्डियोलॉजी) – किमान 50 टक्के गुणांसह 12 वीची परीक्षा पास. 12वीत फिजिक्स, केमिस्ट, बायोलॉजी विषय आवश्यक.

* Ex-ITI उमेदवारांसाठी (सर्व पदांसाठी)
मान्यता प्राप्त संस्था किंवा बोर्डाकडून किमान 50 टक्के गुणांसह 10 वीची परीक्षा पास. आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट (एनसीव्हीटी मन्यताप्राप्त) प्राप्त असावा.

* वयोमर्यादा
किमान वय मर्यादा 15 वर्ष आहे. फ्रेशर्ससाठी कमाल वयोमर्यादा 22 वर्ष आणि एु-खढख कॅटेगरीसाठी 24 वर्ष आहे.
कमाल वयोमर्यादामध्ये ओबीसी वर्गासाठी तीन वर्ष, एससी/एसटी वर्गासाठी पाच वर्ष आणि दिव्यांगाना दहा वर्षांची सूट दिली जाईल.

* स्टायपेंड : नियमानुसार दिली जाईल.

* निवड (सब कॅटेगरीच्या अंकांना 200 अंकामध्ये कन्व्हर्ट केले जाईल.)
फ्रेशर्स कॅटेगरी – 10 वीच्या गुणांना 200 अंकात कन्व्हर्ट केले जाईल.

Ex-ITI कॅटेगरी – 10 वीच्या गुणांना 100 अंक आणि आयईआयच्या गुणांना 100 अंकांमध्ये कन्व्हर्ट केले जाईल. एकुण 200 पैकी अंक येतील.

मेडिकल लॅबोरेट्री टेक्निशियन – 12वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) मध्ये प्राप्त अंकांना 200 अंकांमध्ये कन्व्हर्ट केले जाईल.

तीन कॅटेगरीचे अंक 200 अंकांमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर जास्त गुण असणार्‍यांना मेरिटमध्ये वर ठेवले जाईल. हेच मेरिट निवडीचे आधार असेल.

* संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा
https://iroams.com/Apprentice/recruitmentIndex

* अर्ज शुल्क –
सामान्य वर्गासाठी 100 रुपये अर्ज शुल्क असेल. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना शुल्क नाही.

* प्रशिक्षण कालावधी
काही ट्रेडसाठी प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष ठरवण्यात आला आहे तर काहीसाठी दोन वर्ष करण्यात आला आहे.

* ट्रेनिंग संपल्यानंतर कोणत्याही ट्रेनीला कोणत्याही रोजगाराच्या प्रस्तावासाठी कंपनी बाध्य असणार नाही आणि ट्रेनी कंपनी द्वारे प्रस्तावित कोणताही रोजगार स्वीकारण्यासाठी बाध्य नसेल.