खुशखबर ! रेल्वेत मोठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर रेल्वेमधील ‘ग्रुप डी, लेव्हल १’ भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या भरतीत एकूण १,०३,७६९ पदे निघाली आहेत. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया रेल्वे ‘रिक्रुटमेंट बोर्डा’ने (आरआरबी) मंगळवारी सरू केली आहे.

विविध भागात १८ प्रादेशिक रेल्वे रिक्रुटमेंट सेल असणार आहेत. त्यात उमेदवाराने आपल्या भागातील ‘आरआरसी’कडे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची वेबसाइट मंगळवार खुली करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल आहे. त्यामुळे उमेदवारांनी घाई केली पाहिजे.

ट्रॅक मेन्टेनर ग्रेड ४, विद्युत, यांत्रिकी व सिन्गल आणि दळणवळण या वेगवेगळ्या विभागांत सहाय्यक, सहाय्यक पॉईन्ट्समन वगैरे प्रकारची ही पदे आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३१ वर्षे आहे. तर दहावी उत्तीर्ण तसेच ‘आयटीआय’ उत्तीर्ण वा अ‍ॅप्रेंटिसशिप यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, अशा शैक्षणिक अटी आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार या पदांचा पगार दरमहा १८ हजार रुपये असणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या जागा भरल्या जात असल्या तरी निवडप्रक्रिया पूर्ण होण्यास आणि त्यानंतर पात्र उमेदवारांना नोकऱ्या मिळेपर्यंत दिवाळी होऊन गेलेली असेल. कारण ही लेखी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे. तसंच ही परीक्षा संगणकावर होणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा

१२ मार्च : अर्ज भरण्यासाठी सुटले, अर्ज भरण्यास सुरुवात
१२ एप्रिल : अर्जांचा शेवटचा दिवस, अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
१८ एप्रिल : पोस्टाने आणि स्टेट बँकेतून शुल्क भरण्याचा शेवटचा दिवस
२३ एप्रिल : अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरण्याचा शेवटचा दिवस
२६ एप्रिल : शुल्कासह परिपूर्ण अर्ज दाखल करण्याची मुदत