रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या २०० मराठी मुलांना बाहेर काढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

रेल्वे भरती बोर्डाकडून ग्रुप डीच्या ६४ हजार जागांसाठी बुधवारपासून देशभरात परिक्षा घेण्यात येत आहेत. या परिक्षेला राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात येत आहेत. गुरुवारी (दि.४) सकाळी ९ वाजता पेपर असल्याने विद्यार्थी सकाळी लवकरच पुणे जिल्ह्यातील नऱ्हे या परिक्षा केंद्रावर हजर झाले होते. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवून देखील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5cbcf2f2-c7f2-11e8-9a16-65ba2677be4a’]

परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थ्यांकडे असणारे आधार कार्ड पाहून असून सुद्धा परीक्षेला बसू दिले नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले पॅन कार्ड, वाहन परवाना अशी ओळखपत्र दाखवून देखील त्यांना परिक्षेला बसू दिले नाही. विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थ्यांकडे असणारे आधार कार्ड पाहून यामध्ये त्रुटी असल्याचे कारण देत त्यांना धक्के मारून परिक्षा केंद्राबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे गेल्या दोन दिवसात साधारण २०० पेक्षा अधिक परीक्षार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. या संपूर्ण प्रकाराची तक्रार देण्यासाठी परीक्षार्थी नऱ्हे पोलिस चौकीत गेले असता त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी न्याय मिळण्यासाठी पुण्याच्या रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान, पुण्यात चार ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. केवळ नऱ्हे य़ेथील परीक्षा केंद्र सोडल्यास इतर सर्व परीक्षा केंद्रांवर कोणत्याही एका ओळखपत्रावर किंवा ओळखपत्राच्या कलर छायांकीत प्रतीवर परीक्षेला बसू दिले जात आहे.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’62cd39bb-c7f2-11e8-86e0-bfa4fa70c4a2′]

नऱ्हेच्या परीक्षा केंद्रातील कर्मचारी हे परीक्षार्थ्यांची उद्धट पद्धतीने बोलत असून कोणतेही कारण न देता मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखत असल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे या परीक्षार्थ्यांना पुन्हा परीक्षा घेण्याची संधी मिळावी, अशी मागणी संतप्त परीक्षार्थ्यांनी केली आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6813c899-c7f2-11e8-bbb8-adb290194afd’]

परीक्षार्थ्यांनी आधार कार्ड दाखविल्यानंतर आधार कार्ड डुप्लिकेट असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यानंतर परीक्षार्थ्यांनी पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यामध्ये त्रुटी काढून परीक्षेला पासून वंचित ठेवले. काही परीक्षार्थी परीक्षेला बसले मात्र ऐनवेळी त्रुटी काढून त्यांना परीक्षा केंद्रातून धक्के मारून बाहेर काढल्याचे परीक्षार्थी राहुल निकम आणि किरण मोकळ यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षा केंद्रावर रेल्वे सुरक्षा कर्मचारी असताना देखील त्यांना काहीचे करता आले नसल्याचे निकम यांनी सांगितले.

‘त्या’ प्रकरणात धनंजय मुंडे यांना काेर्टाकडून दिलासा