आता ट्रेन सुटण्यापूर्वी 30 मिनिट अगोदर सुद्धा करू शकता बुकिंग, रेल्वेने आजपासून बदलले ‘हे’ नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पॅसेंजर्सला दिलासा देण्यासाठी इंडियन रेल्वे दूसरा रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याची सुविधा देत आहे. हा दुसरा रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन उघडण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर तयार केला जाईल. नवे बदल आज म्हणजे 10 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत. अगोदर कोविड-19 महामारीमुळे यामध्ये 2 तासांचा बदल केला होता.

काय होता अगोदर नियम?
रेल्वेद्वारे जारी वक्तव्यात म्हटले आहे की, कोरोना काळाच्या अगोदरच्या नियमानुसार पहिला रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन उघडण्याच्या चार तास अगोदर तयार केला जात होता. यानंतर इंटरनेट किंवा पीआरएस सिस्टमद्वारे उपलब्ध बुकिंग प्रथम या, प्रथम मिळवा, या आधारावर होत होती. ही बुकिंग दूसरा रिझर्व्हेशन चार्ट तयार होईपर्यंत होत होती.

दुसरा रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन उघडण्याच्या 30 ते 5 मिनिटे अगोदर तयार केला जात होता. या दरम्यान, रिफंड नियमांतर्गत आगोदर बुक केलेली तिकिट कॅन्सल करण्याची सुद्धा परवानगी होती. कोरोना व्हायरस महामारीमुळे दुसर्‍या रिझर्व्हेशन चूटच्या नियमित बदल करण्यात आला होता. परंतु, पुन्हा नियमात बदल करत, आता पुन्हा दुसरा रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन सुटण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर तयार होईल.

दूसरा चार्ट तयार होण्यापूर्वी अगोदर तिकिट बुकिंगची सुविधा ऑनलाइन आणि पीआरएस तिकिट काऊंटरवर उपलब्ध असेल. ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटे अगोदर चार्ट तयार करण्याच्या तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने सॉफ्टवेयरमध्ये आवश्यक दुरूस्ती केली आहे.

अगोदर ट्रेनचा पहिला रिझर्व्हेशन चॅट ट्रेन सुटण्यापूर्वी 4 तास अगोदर तयार होत असे. दुसर्‍या चार्टचा कालावधी बदलल्याने आता प्रवाशां मसोर तिकिट बुक करण्याचे जास्त ऑपशन असेल. प्रवाशी दुसरा चार्ट तयार होण्यापूर्वी इंटरनेटवर तिकिट बुक करू शकतात.