खुशखबर ! आता रेल्वेचं तिकीट बुक करताना राहणार नाही ‘वेटिंगचं टेन्शन’, लवकरच तुमच्या मागणीवर चालेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक स्पेशल ऑफर आणली आहे. त्यानुसार आता प्रवाशांच्या मागणीनुसार ट्रेन चालवली जाईल. विशेष म्हणजे या ट्रेनला वेटिंग लिस्ट नसेल. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वीके यादव यांनी दिली आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वीके यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रूटवर मागण्यांनुसार यात्री ट्रेन चालवली जाईल. ही ट्रेन वेटिंग लिस्टच्या कटकटीपासून मुक्त असेल. दोन मार्गांवर डीएफसीचे (Dedicated Freight Corridor) काम पूर्ण झाल्यावर, दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडाच्या लाइनमधून मालगाड्यांची वाहतूक पूर्णपणे हटवली जाईल. या लाइनवरून प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या चालवल्या जातील.

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रूटच्या ट्रेनची 160 किलोमीटर प्रति तास गती वाढविण्याला मंजुरी मिळाली आहे. पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण होईल.

या मार्गांवरही सुरु करणार सुविधा –

उत्तर-दक्षिण (दिल्ली-चेन्नई), पूर्व-पश्चिम (मुंबई-हावड़ा) आणि खरगपुर-विजयवाडा या मार्गांवर लोकेशन सर्वेचे काम पूर्ण केले जाईल. हा कॉरिडॉर 6,000 किलोमीटर लांबीची असेल आणि पुढील 10 वर्षात याचे काम पूर्ण होईल.

 

visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like