लासलगावमधून धान्यातील पिवळ्या सोन्याची रेल्वेद्वारे निर्यात सुरू

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कांद्याचे माहेरघर असलेल्या लासलगाव नगरीतून रेल्वेने देश-विदेशात मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जातो. यावर्षी धान्यातील पिवळे सोने समजल्या जाणाऱ्या मक्याचीही निर्यात लासलगाव रेल्वे स्थानकातून मालगाडीने सुरू झाली.

लासलगाव येथून पहिल्यांदाच रेल्वेद्वारे सुमारे तेराशे टन मका २१ रेल्वे वॅगन्समधून शिवशक्ती ट्रेडर्स यांच्यामार्फत मुंबईकडे पाठविला जात आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी सचिन कुमार ब्रम्हेचा यांनी खरेदी केलेल्या मक्याला निर्यातीसाठी पहिल्यांदाच रेल्वे मार्गाने पाठविला जात असल्याने यातून रेल्वेला सुमारे ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती रेल्वे मालवाहतुकीचे लासलगाव येथील अडते नीलेश उपाध्ये यांनी यावेळी दिली.

रेल्वे वाहतुकीचे फायदे
माल थेट जाणार असल्याने कामकाज सोपे आणि वेळेची बचत
रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हाताळणी प्रक्रिया अत्यल्प
रस्ते वाहतूक खर्च अधिक येताे, रेल्वेने खर्चात बचत
रस्ते वाहतुकीत होणाऱ्या चोऱ्या व अपघात कमी होण्यास मदत होईल.