Railway Station Development Fee | नववर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! एअरपोर्ट प्रमाणे भरावा लागेल स्टेशन युजर चार्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Railway Station Development Fee | नवीन वर्ष रेल्वे प्रवाशांच्या खिशावर बोजा टाकणारे ठरणार आहे. लवकरच तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी 50 रुपये जास्त द्यावे लागतील. खरेतर, रेल्वे मंत्रालयाने (Railways Ministry) विमानतळाच्या धर्तीवर विकसित केलेल्या रेल्वे स्थानकांवर स्टेशन विकास शुल्क (Railway Station Development Fee) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रवाशांना यूजर चार्ज म्हणून भरावे लागणार आहे.

 

10 ते 50 रुपये या दरम्यान असेल शुल्क
एयरपोर्टच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून युजर चार्जेस घेतले (Railway Station Development Fee) जाणार आहेत. हे शुल्क 10 ते 50 रुपये पर्यंत असेल. तसेच रेल्वे देशभरातील 400 रेल्वे स्थानकांना (Indian Railway) जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज बनवण्याचे काम करत आहे. यातील बहुतांश रेल्वे स्टेशन पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप मध्ये आहेत. गांधीनगर (Gandhi Nagar) आणि भोपाळचे राणी कमलापती (Rani Kamlapati) रेल्वे स्टेशन आधीच पूर्ण झाली आहेत. त्यांचे उद्घाटनही पीएम मोदींनी (PM Narendra Modi) केले आहे.

 

रेल्वे बोर्डानेही मान्यता दिली
रेल्वे बोर्डाने (Railway Board)प्रवाशांवर युजर चार्जेस लावण्यास मान्यता दिली आहे.
वेगवेगळ्या वर्गात प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही शुल्क वेगवेगळे असेल आणि तिकिटातच त्याचा समावेश असेल.
रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, 10 रुपये ते कमाल 50 रुपये युजर्स चार्ज आकारले जाईल.

एयरपोर्टवर असे शुल्क आकारले जाते
अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क 10 रुपये असेल.
तसेच, स्लीपरमध्ये प्रवास करणाऱ्यांना 25 रुपये आणि एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांना 50 रुपये अतिरिक्त युजर्स चार्ज लावला जाईल.
सध्या या प्रकारचे शुल्क देशातील विमानतळावरच आकारले जाते.
मात्र, रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे सर्विस चार्ज कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

 

प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणाऱ्यांना सर्विस चार्ज म्हणून 10 रुपये द्यावे लागतील.
एयरपोर्टप्रमाणे विकसित झालेल्या स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांकडून निश्चित किंमतीच्या 50 टक्के शुल्क आकारले जाईल.

 

Web Title :- Railway Station Development Fee | railway passengers to pay rs 10 50 extra as development fee for revamped stations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘हे सरकार गेंड्यापेक्षा ही जास्त असंवेदनशील’ ! राज्यातील निर्बंधावरुन चंद्रकांत पाटलाची राज्य सरकारवर टीका

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

Ambani Family | अंबानी कुटुंबाला बॉलिवूडच्या टॉपच्या ‘या’ कलाकारामुळे करोडो रुपयांचा फटका, का होतेय एकच चर्चा?