रेल्वेचं तिकिट ‘बुक’ केल्यानंतर देखील तुम्ही बदलू शकता ‘तारीख’, जाणून घ्या प्रकिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे कायमच आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा देते. परंतू रेल्वेच्या अशा अनेक सेवा आहेत ज्याबद्दल ग्राहकांना कल्पना नाही. तुम्ही रेल्वेच्या तिकिटात तुमच्या प्रवासाची तारीख बदलू शकतात. काही कारणाने ठरलेला तुमचा रेल्वे प्रवास मिस होणार असेल तर तुम्ही त्या आधीची किंवा त्यानंतरची प्रवासाची तारीख देखील निश्चित करु शकतात. म्हणजे तुम्ही तिकिट रद्द न करता तारखेत बदल करु शकतात.

असा घ्या लाभ –
रेल्वे आपल्या ग्राहकांना तिकिटावरील तारीख बदलण्याची सेवा देते. रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर यांसंबंधित माहिती उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ कन्फर्म, आरएसी आणि वेटिंग तिकिटावर घेता येतो. परंतू ही सेवा फक्त ऑफलाइन तिकिट बूकिंगवर आहे. जर तुम्ही IRCTC वरुन तिकिट बूक करत असाल तर त्याच्या तारखेत फेरबदल करता येणार नाही.

रेल्वेच्या प्रवासाच्या तारखेच्या दोन दिवस आधी करत येईल बदल –
एका स्टेशनवरुन बुक केलेले तिकिट प्रवासाच्या तारखेत एकदाच बदल करु शकतात. हे बदल रेल्वे प्रवासाच्या दोन दिवस आधी करावे लागेल.