प्रवाशांनो लक्षात ठेवा ! रेल्वेचं तिकीट बुक करताना करा ‘असं’ पेमेंट, वाचतील पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेबिट कार्डद्वारे तिकीट बुकिंगच्या पेमेंटवर प्रवासी ‘झिरो पेमेंट गेटवे चार्ज’चा फायदा घेऊ शकतात. जर आपण प्रवास करणार असाल आणि ट्रेनचे तिकिट बुक करणार असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. कारण ही बातमी वाचल्यानंतर रेल्वेच्या तिकिटाची बुकिंग करताना तुम्ही काही रक्कम वाचवू शकाल. अनेकदा ऑनलाईन तिकीट बुकिंग देणारी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने प्रवाशांना पैशाची बचत करण्याचा मार्ग दाखवला आहे. IRCTC ने ट्वीटमध्ये सांगितले आहे की IRCTC कडून रेल्वेचे तिकिट बुकिंगसाठी डेबिट कार्ड पेमेंट (Debit Card Payment) द्वारे प्रवासी पैसे वाचवू शकतात.

झिरो पेमेंट गेटवे शुल्काचा लाभ घ्या
डेबिट कार्डद्वारे तिकीट बुकिंगच्या पेमेंटवर प्रवासी ‘झिरो पेमेंट गेटवे चार्ज’ (Zero Payment Gateway Charge) घेऊ शकतात. म्हणजेच डेबिट कार्ड वापरकर्त्यावर हा शुल्क आकारला जाणार नाही. असा व्यवहार १ लाख रुपयांपर्यंत होईल.

IRCTC वेबसाइट वरून रेल्वेचे तिकिट कसे बुक करावे

1) रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी प्रथम आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in वर जा. येथे लॉगिन (LOGIN) चा पर्याय दिसेल. लॉग इन करण्यासाठी आपण आधी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जर ते नसेल तर प्रथम तुम्ही रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करुन तुमचा आयडी बनवावा. यासाठी मोबाईल नंबर, नाव, ईमेल आयडी आणि पत्ता यासारख्या वैयक्तिक माहिती द्यावी लागणार. आपल्याकडे आधीपासूनच लॉगिन आयडी असल्यास यूजर आईडी, पासवर्ड आणि कैप्चा प्रविष्ट करुन लॉग इन करा.

2) लॉगिन नंतर प्रवासाची माहिती ‘Book Your Ticket’ मध्ये भरा. त्यानंतर, तारीख निवडा आणि Find Trains वर क्लिक करा.

3) आता तुम्हाला दोन स्थानकांदरम्यान धावणार्‍या सर्व गाड्यांची संपूर्ण यादी मिळेल. Check Availability & Fare पर्यायासह स्लीपर क्लास, एसी ३ टियर, एसी २ टियर, एसी फर्स्ट क्लास, एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे पर्याय उपलब्ध असतील. जनरल, ज्येष्ठ नागरिक, लेडीज, दिव्यांग, तत्काल आणि प्रीमियम तत्काल सारख्या कोट्यासाठीही पर्याय असेल. तसेच तुम्हाला भाडे बाबतही माहिती मिळेल.

4) ज्या ट्रेनमध्ये तिकिटे बुक करायची आहेत त्यांचा वर्ग, कोटा निवडा आणि Book Now वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आपल्याला प्रवाशाचे नाव, वय, लिंग, मोबाइल नंबर आणि अन्य माहिती भरावी लागेल. यानंतर कैप्चा भरा आणि Continue Booking वर क्लिक करा.

5) आता पेमेंटचा पर्याय उपलब्ध होईल. आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि मोबाइल वॉलेटद्वारे पैसे देऊ शकता. पैसे भरल्यानंतर, तिकीट आरक्षित केले जाईल आणि आपण दिलेल्या मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश येईल. याशिवाय नोंदणीकृत ई-मेल आयडीवरही मेल येईल. तिकिट बुक झाल्यानंतर त्याला प्रिंट करण्याचा पर्यायही मिळेल.

Visit : Policenama.com