Lockdown मध्ये तुमचंही रेल्वे तिकीट रद्द झालं असल्यास आजपासून ‘रिफंड’ मिळेल, ‘इथं’ पाहा कोणाला कधी मिळणार पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन होण्यापूर्वी जर आपण रेल्वेच्या तिकिट काउंटरवरून ट्रेनचे तिकिट बुक केले असेल तर आता त्याचा रिफंड मिळू शकतो. रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, ज्यांचा रिफंड आता रेल्वे देत आहे. सोमवारपासून आरक्षण केंद्रावर जाऊन प्रवासी आपले तिकीट जमा करून रिफंड घेऊ शकतात. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन तारखांनुसार यासाठी नियम ठरवले आहेत. विशेष म्हणजे लोक देशातील कोणत्याही आरक्षण केंद्रावर जाऊन तिकिट दाखवून रिफंड घेऊ शकतात. तुम्हाला रोख स्वरूपात रिफंड मिळेल. जे लोक काही कारणास्तव ठराविक कालावधीत रिफंड घेऊ शकणार नाही, त्यांना १८० दिवसांचा कालावधी मिळेल.

आजपासून रिफंड
कोरोना महामारीमुळे मार्चच्या अखेर रेल्वेचे काम थांबवावे लागले होते. गाड्या रद्द करण्यात आल्या आणि आरक्षण केंद्रेही बंद केली गेली, त्यामुळे लोकांना रिफंड देखील मिळू शकला नव्हता. आरक्षण केंद्रावर २२ मेपासून पुन्हा तिकीट बुकिंग सुरू झाले. अशात ते लोक देखील आरक्षण केंद्रावर पोहोचू लागले, ज्यांची तिकिटे रद्द झाली होती, पण तेथे रिफंड नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.

३० जून पर्यंतच्या तिकिटांचा रिफंड मिळणार
तिकीट रिफंडबाबत शनिवारी एक पत्र जारी केले असून त्यानुसार २२ मार्च ते ३० जून पर्यंत प्रवास करण्यासाठी बुक केलेल्या तिकिटांचे पैसे परत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया कोणाला कधी रिफंड मिळणार-

ज्यांनी २२ ते ३१ मार्च पर्यंत प्रवास करण्यासाठी तिकिटे बुक केली होती, ते सोमवारी २५ मेपासून जाऊन त्यांची रक्कम घेऊ शकतात.
१ ते १४ एप्रिल दरम्यान प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करणारे १ जूनपासून रिफंड घेऊ शकतात.
१५ ते ३० एप्रिल दरम्यान प्रवास करण्यासाठी तिकिटे बुक करणारे ७ जूनपासून त्यांची रक्कम घेऊ शकतात.
१ ते १५ मे या कालावधीत बुक केलेल्या तिकिटाची रक्कम १४ जूनपासून परत दिली जाईल.
१६ ते ३० मे पर्यंत तिकिट बुक करणारे २१ जूनपासून त्यांची रक्कम घेऊ शकतील.
१ ते ३० जून पर्यंत प्रवास करणारे २८ जूनपासून पैसे घेऊ शकतील.

हे पैसे रोख दिले जातील. आरक्षण केंद्रावर गर्दी होऊ नये आणि लोकांची कामे शांततेत पार पडतील, यासाठी सोशल डिस्टंसिंगची काळजी घेऊन या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like