Railway Ticket Refund Rules | ट्रेनचे तिकीट कॅन्सल केले तर कापले जातात ‘एवढे’ चार्जेस, जाणून घ्या रेल्वेचे कॅन्सलेशन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Railway Ticket Refund Rules |भारतातील सामान्य लोकांच्या जीवनात रेल्वे खुप महत्वाची भूमिका बजावते. अनेकदा आपण ट्रेनने प्रवास करतो. परंतु, कधी-कधी ठरलेला योजना बदलल्याने आरक्षित तिकिट कॅन्सल सुद्धा करावे लागते. अशावेळी अनेक लोकांना या गोष्टीची माहिती नसते की, त्यांना तिकिट कॅन्सल केल्यानंतर किती कॅन्सलेशन चार्ज (Railway Ticket Refund Rules) द्यावा लागेल. यासाठी रेल्वे कॅन्सलेशन पॉलिसीबाबत जाणून घेवूयात.

1. RACWaiting List तिकिट कॅन्सलेशन रिफंडचा नियम

जर तुम्हाला आरएसी आणि वेटिंग लिस्ट तिकिट कॅन्सल करायचे असेल तर ते शेड्यूल डिपार्चरच्या 30 मिनिटे अगोदरपर्यंत कॅन्सल करू शकता.
यामध्ये स्लीपर क्लासमध्ये 60 रुपये कॅन्सलेशन चार्ज लागतो तर एसीमध्ये तो 65 रूपये आहे. उर्वरित पैसे रिफंड मिळतात.

2. कन्फर्म तिकिट कॅन्सलेशन रिफंडचा नियम

रिझर्व्हेशन केले आणि तिकिट कन्फर्म आहे परंतु काही कारणामुळे प्रवास अचानक रद्द करावा लागला तर अशा स्थितीत विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
रेल्वेच्या नियमानुसार, कन्फर्म तिकिट कॅन्सल करण्याच्या योग्य कालमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. योग्यवेळी तिकिट कॅन्सल केले तर चार्ज कमी द्यावा लागेल.
ट्रेन शेड्यूल डिपार्चर वेळेच्या 4 तास अगोदर तिकिट कॅन्सल केले तर कोणताही रिफंड मिळणार नाही.

3. जनरल क्लास (2S) चा नियम जनरल क्लासमध्ये रिझर्व्हेशन

असलेले तिकिट कॅन्सल करण्यासाठी 60 रुपये प्रति प्रवासी कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागेल.
सोबतच ट्रेन सुटण्याच्या 48 तास अगोदर तिकिट कॅन्सल केले जाऊ शकते.

 

4. स्लीपर क्लास (Sleeper Class) चा नियम

स्लीपर क्लासमधील रिझर्व्हेशन कॅन्सल करायचे असेल तर प्रति प्रवाशी कॅन्सलेशन चार्ज 180 रुपये द्यावा लागेल.
हे कॅन्सलेशन ट्रेन सुरू होण्याच्या चार तास अगोदरपर्यंत मान्य आहे.

5. एसी चेयर कार (AC Chair Car) चा नियम

एसी चेयर कार, फर्स्ट एसी आणि एग्झीक्यूटिव्ह क्लासचे रिझर्व्हेशन असेल तर तिकिट कॅन्सल केल्यास 240 रूपये आणि यासोबतच जीएसटी सुद्धा द्यावा लागेल.
स्लीपर क्लास आणि जनरल क्लासमध्ये जीएसटी लागत नाही.

 

Web Title : Railway Ticket Refund Rules | know about the railway cancellation policy how much charge will be deducted

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Taliban New Government | चीन अन् PAK सह ‘हे’ तालिबानचे 6 खास मित्रराष्ट्र, सरकार स्थापना सोहळ्यासाठी मिळाले आमंत्रण; जाणून घ्या भारत काय करणार

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले जाणार का?, वडेट्टीवार म्हणाले…

Corona 3rd Wave | नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट? वीकएंड Lockdown ची घोषणा