रेल्वेचा ‘गलथान’ कारभार ! अजिंठा एक्स्प्रेसच्या वेळेत बदल मात्र तिकीटावर जुनाच ‘टाईम’

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – मनमाडहुन सिकंदराबादकडे जाणाऱ्या अजिंठा एक्स्प्रेस (१७०६३) या गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही रेल्वे मनमाडहून नऊच्या दरम्यान निघत होती. आता येत्या दहा जानेवारी २०२० पासून ही गाडी मनमाडहून दुपारी पावणेपाच वाजता निघणार आहे. मात्र या गाडीचे रिझर्वेशन करीत असताना तिकीटावर जुनाच टाइम येत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसत आहे.

लासलगांव येथील एका प्रवाशाने अजिंठा एक्सप्रेस या गाडिने सिकंदराबाद साठी रिझर्वेशन केले. मात्र तिकीटावर असलेली गाड़ी निघण्याची वेळ ही जुनीच असल्याने त्यांची गाडी सुटली. रेल्वेच्या अशा गलथान कारभारामुळे ज्यांना गाडीचे वेळापत्रक बदलले आहे हे माहीत नसेल त्यांची चांगलीच फजीत होत आहे.

बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्या रेल्वेला साधे बदललेल्या गाडीचा टाईम टेबल अद्ययावत करता आलेला नाही. रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या पोर्टलवर देखील जुनेच वेळापत्रक असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या दिशेने वाटचाल करत असताना रेल्वे विभागाने मनमाड वरून सुटणाऱ्या अजिंठा एक्सप्रेस या गाडीच्या वेळात अजुन पर्यंत बदल करण्याची तसदी घेतलेली नाही. या गाडीच्या वेळापत्रकात बदल होऊन सात दिवस उलटले असले तरीही रेल्वे प्रशासन सुस्त दिसत असून यांच्या गलथान पनाचा फटका प्रवाशांना बसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/