Railway Underpass In Khadki Pune | खडकी येथील रेल्वे अंडरपासचे होणार रुंदीकरण पुणे महापालिका देणार 25 कोटी रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Railway Underpass In Khadki Pune | खडकी येथील दोन्ही रेल्वे अंडरपासच्या रुंदीकरणासाठी महापालिका Pune Municipal Corporation (PMC) पंचवीस कोटी रुपये रेल्वेला देणार आहे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे या भागातील वाहतुक कोंडीचा (Pune Traffic Jam) प्रश्न सुटण्यास मदत होईल. (Railway Underpass In Khadki Pune)

 

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड Khadki Cantonment Board (KCB), रेल्वे प्रशासन (Pune Railway Administration) यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेने सदर कामे महापालिकेच्या खर्चाने करण्याची तयारी दाखविली आहे. त्यानुसार ही कामे केली जाणार आहे, अशी माहीती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. (Railway Underpass In Khadki Pune)

खडकी येथे सध्या मेट्रोचे (Pune Metro) काम सुरु आहे. याच मार्गाजवळून रेल्वे मार्ग आहे. रेल्वे मार्गावर खडकी पोलिस स्टेशन (Khadki Police Station) आणि खडकी एसीपी ऑफिस (Khadki ACP Division Office) समोर तसेच बोपोडी येथे अंडरपास (Bopodi Underpass) आहे. या अंडरपासमुळे औंध, बोपोडी, खडकी, येरवडा (Yerwada) भागातील वाहनांना ये जा करणे सोपे होते. परंतु या अंडरपासची रुंदी कमी असल्याने या भागात वाहतुक कोंडी होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. सदर कोंडी कमी करण्यासाठी खडकी पोलिस स्टेशन आणि खडकी एसीपी कार्यालयाजवळी अंडरपासचे रुंदीकरण करण्याची तयारी महापालिकेने दाखविली. त्याचा सुमारे एकुण पंचवीस कोटी रुपये खर्च हा रेल्वे प्रशासनाला डिपोझिट म्हणून दिला जाणार आहे. तसेच या अंडरपासजवळ असलेल्या एका रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यासाठी जागा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड उपलब्ध करून देणार आहे.

 

Web Title :  Railway Underpass In Khadki Pune | The widening of the railway underpass at
Khadki will be done by the Pune Municipal Corporation at a cost of Rs 25 crore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा