‘या’ दिवाळीपासून करा ऑनलाइन शॉपिंग ! रेल्वे पोहचवणार लवकर तुमचे समान तुमच्यापर्यंत

नवी दिल्ली : फेस्टिव्हल सीझन पहाता भारतीय रेल्वे ऑनलाइन शॉपिंग करणार्‍यांसाठी एक प्लॅन तयार करत आहे. या अंतर्गत बुक करण्यात आलेले सामान रेल्वे तुमच्यापर्यंत तातडीने पोहचवेल. भारतीय रेल्वे आपल्या प्रीमियम ट्रेनमधून पार्सल व्हॅन लावून ई कॉमर्स कंपन्यांची उत्पादने लवकर पोहचवत आहे. नुकताच असा प्रयोग मुंबई सेंट्रलहून नवी दिल्लीच्या दरम्यान चालणार्‍या रेल्वेच्या प्रमियम ट्रेन मुंबई राजधानी स्पेशल ट्रेन नंबर 02951 मध्ये करण्यात आला. ही रेल्वेची हायस्पीड ट्रेन आहे.

राजधानी ट्रेनमध्ये सुद्धा होऊ शकतो प्रयोग
रेल्वे सध्या वेस्टर्न रेल्वेच्या मुंबई राजधानीतून ई-कॉमर्स कंपन्यांचे उत्पादन पोहचवत आहे. परंतु, ऑर्डरची उपलब्धता पाहता येत्या दिवसात अन्य राजधानी ट्रेनमध्ये सुद्धा अशाप्रकारचे प्रयोग होऊ शकतात. राजधानी ट्रेनमधून सामान पाठवणे महागात पडते, परंतु, ई कॉमर्स कंपन्यांना आपले प्रॉडक्ट लवकर ग्राहकांपर्यंत पोहचवायचे असते, ते राजधानीद्वारे आपले सामान बुक करून पाठवू शकतात.

रेल्वे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणार
शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे, बाजारापर्यंत कृषी उत्पन्न पोहचवणे आणि ग्राहकांना स्वस्त फळे आणि भाज्या उपलब्ध करण्यासाठी सरकारने किसान स्पेशल ट्रेन चालवण्या निर्णय घेतला आहे. आतापर्यंत चार किसान ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या देवलालीपासून बिहारच्या दानापुरच्या दरम्यान देशाची पहिली किसान ट्रेन 7 ऑगस्टला सुरू करण्यात आली होती. यानंतर 9 सप्टेंबरला दुसरी किसान ट्रेन आंध्रच्या अनंतपुरहून दिल्लीच्या आदर्शनगरच्या दरमयान चालवली गेली. पुन्हा तिसरी किसान रेल्वे बेंगळुरू हून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीनच्या दरम्यान चालवली गेली. तर, आज नागपुरहून दिल्लीच्या आदर्शनगरसाठी चौथी किसान ट्रेन रवाना करण्यात आली.

सर्वसामान्यांना मिळेल स्वस्त फळे-भाजी
13 ऑक्टोबरला सायंकाळी किसान रेलद्वारे अधिसूचित भाज्या आणि फळांच्या वाहतुकीवर 50 टक्के सबसिडी देण्याची घोषणा केली. रेल्वेने मागच्या बुधवारी नागपुरहून दिल्लीच्या आदर्शनगरसाठी चौथी किसान स्पेशल ट्रेन रवाना केली. यापूर्वी महाराष्ट्राच्या देवलालीहून बिहारच्या दानापूर, आंध्र प्रदेशच्या अनंतपुरहून दिल्लीचे आदर्शनगर आणि बेंगळुरूहून दिल्लीच्या दरम्यान सुद्धा किसान ट्रेन चालवली जात आहे.

केंद्र सरकारने वाहतुकीवर 50 टक्के सबसिडी कक्षेत आंबे, केळी, पेरू, कीवी, लीची, पपई, मोसंबी, संत्रा, किनू, लिंबू, अननस, डाळिंब, फणस, सफरचंद, बदाम, ओनला, पॅशन फ्रूट आणि नासपातीचा समावेश केला आहे. तर, भाज्यांमध्ये फ्रेंच बीन, कारले, वांगी, शिमला मिरची, गाजर, कोबी, हिरवी मिरची, भेंडी, काकडी, मटर, लसूण, कांदा, बटाटे आणि टोमॅटोच्या वाहतुकीवर शेतकर्‍यांना ताबडतोब सबसिडी देण्याची तरतूद केली आहे.