रेल्वेची मोठी घोषणा ! 1 जूनपासून धावणार 200 Non-AC Trains, ऑनलाईन बुकिंग लवकरच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार भारतीय रेल्वे 1 जूनपासून वेळापत्रकानुसार दररोज 200 नॉन एसी रेल्वे सुरू करणार असून त्याची ऑनलाईन बुकिंग लवकरच चालू होणार आहे.


या सर्व रेल्वे वेळापत्रकानुसार धावतील. दरम्यान, रेल्वेचं वेटिंग तिकीट देखील मिळू शकतं असं सांगितलं जात आहे. मात्र, तात्काळ आणि अति तात्काळ अशी सुविधा असणार नाही. या रेल्वेची बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाईटव्दारे होणार आहे. बुकिंग कधी सुरू होणार याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.