Fact Check : रेल्वेनं 1.5 लाख पदांसाठीची भरती परीक्षा रद्द केली ? जाणून घ्या सत्य

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) काही दिवसांपूर्वी दीड लाख भरती करण्याची घोषणा केली आहे. या सर्व प्रकारांमध्ये ही भरती परीक्षा रद्द करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. व्हायरल बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकारने या भरती परीक्षांवर बंदी घातली आहे. अनेक प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर अनेक अफवा वेगाने पसरत आहेत. पीआयबीने या दाव्याचे सत्य शोधले आहे.

Advt.

पीआयबीला या दाव्याचे सत्य शोधून ते बनावट असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने त्यांच्या ट्विटवर माहिती दिली आहे. एक वर्तमानपत्राच्या हेडलाईनमध्ये असा दावा केला जात आहे की, 15 डिसेंबरपासून रेल्वेने 1.5 लाख पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पीआयबी फॅक्ट चेकला आढळले की हा दावा खोटा आहे आणि हेडलाईन बदलली गेली आहे. रेल्वे मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

रेल्वे भर्ती मंडळाने (आरआरबी) 1.5 लाख रिक्त जागांच्या परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली असून या घोषणेनुसार या परीक्षा यावर्षी 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. रेल्वे 15 डिसेंबरपासून तीन श्रेणींमध्ये 1.40 लाख पदांची भरती सुरू करणार आहे. यासंदर्भात रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी निवेदनात म्हटले होते की, रेल्वे सुमारे 1.40 लाख पदांच्या भरतीसाठी 15 डिसेंबरपासून संगणक-आधारित परीक्षा घेण्यास सुरुवात करेल.