Indian Railways : रेल्वेने मार्चपर्यंत वाढवल्या ‘या’ स्पेशल ट्रेनच्या फेर्‍या, होळीला घरी जाणार्‍यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण होळीला ट्रेनने आपल्या घरी जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. रेल्वेने प्रवाशांची मागणी पाहून अनेक ट्रेनच्या संचालनाचा अवधी मार्चपर्यंत वाढव÷ण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना होईल ज्यांना होळीला घरी जायचे आहे. यावेळी 28 आणि 29 मार्चला होळी आहे.

या ट्रेनचे तिकिट बुकिंग पीआरएस काऊंटर्स आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी करू शकतात. पश्चिम रेल्वेने सुद्धा 12 जोडी ट्रेनच्या कालावधीचा विस्तार केला आहे.

या आहेत त्या ट्रेन…
1. ट्रेन क्रमांक 09708 (श्रीगंगानगर-बांद्रा टर्मिनस स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
2. 09707 (बांद्रा टर्मिनस-श्रीगंगानगर स्पेशल) 02 एप्रिल 2021 पर्यंत धावेल
3. 02473 (बीकानेर-बांद्रा टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल) 29 मार्च 2021 पर्यंत धावेल
4. 02474 (बांद्रा टर्मिनस-बीकानेर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल) 30 मार्च 2021 पर्यंत धावेल
5. 02489 (बीकानेर-दादर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल) 30 मार्च 2021 पर्यंत धावेल
6. 02490 (दादर-बीकानेर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
7. 02495 (बीकानेर-कोलकाता साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल) 25 मार्च 2021 पर्यंत धावेल
8. 02496 (कोलकाता-बीकानेर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल) 26 मार्च 2021 पर्यंत धावेल
9. 02458 (बीकानेर-दिल्ली सराय रोहिल्ला सुपरफास्ट स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
10. 02457 (दिल्ली सराय रोहिल्ला-बीकानेर सुपरफास्ट स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
11. 04712 (श्रीगंगानगर-हरिद्वार स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
12. 04711 (हरिद्वार-श्रीगंगानगर स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
13. 04731 (दिल्ली-बठिंडा स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
14. 04732 (बठिंडा-दिल्ली स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
15. 02471 (श्रीगंगानगर-दिल्ली सुपरफास्ट स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
16. 02472 (दिल्ली-श्रीगंगानगर सुपरफास्ट स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
17. 04888 (बाडमेर-ऋषिकेश स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
18. 04887 (ऋषिकेश-बाडमेर स्पेशल) 01 एप्रिल 2021 पर्यंत धावेल
19. 09611 (अजमेर-अमृतसर द्विसाप्ताहिक स्पेशल) 27 मार्च 2021 पर्यंत धावेल
20 09612 (अमृतसर-अजमेर द्विसाप्ताहिक स्पेशल) 01 एप्रिल 2021 पर्यंत धावेल
21. 09613 (अजमेर-अमृतसर द्विसाप्ताहिक स्पेशल) 31 मार्च 2021 पर्यंत धावेल
22. 09614 (अमृतसर-अजमेर द्विसाप्ताहिक स्पेशल) 28 मार्च 2021 पर्यंत धावेल
23. 06053 (मदुरई-बीकानेर साप्ताहिक स्पेशल) 25 मार्च 2021 पर्यंत धावेल
24. 06054 (बीकानेर-मदुरई साप्ताहिक स्पेशल) 28 मार्च 2021 पर्यंत धावेल