Coronavirus : रेल्वेने तयार केले 4002 कोविड कोच, महाराष्ट्र आणि दिल्लीकडून आली मागणी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची प्रकरणे वाढत असताना रेल्वेने आपले कोविड कोच पुन्हा एकदा रूग्णांच्या देखरेखीसाठी तयार केले आहेत. रेल्वेकडे सध्या 4002 असे कोच आहेत, जे कोरोना कोचमध्ये बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिघडत चालल्याने बेड उपलब्ध नाहीत, यानंतर पश्चिम रेल्वेने 21 आयसोलेशन ट्रेन कोच पुरवल्या आहेत. तर दिल्ली सरकारने सुद्धा कोविड कोचची मागणी केली आहे. दिल्ली सरकारने हे कोच आनंद विहार आणि शकूर वस्तीमध्ये लावण्यास सांगितले आहे.

 

 

 

 

कोविड कोचसाठी रेल्वेने मागच्या वर्षी आपल्या स्लीपर आणि काही जनरल कोचला मॉडिफाय केले होते, यामध्ये ऑक्सीजन सिलेंडर आणि अन्य आवश्यक उपकरणे सुद्धा ठेवली गेली होती. परंतु मेटल बॉडीच्या कोचच्या आतमध्ये उन्हाळ्यात गरमीमुळे रूग्णाला ठेवणे अशक्य आणि अवघड ठरत आहे. यासाठी कोरोनाच्या सध्याच्या लाटेत याच्यासाठी मागणी आलेली नाही.

मागच्या वर्षी केवळ 200 कोचचा वापर
मागच्या वर्षीसुद्धा केवळ काही दिवसांसाठी 200 कोचचा वापर झाला होता. रेल्वेच्या या कोचपैकी काही पूर्व उत्तर प्रदेशच्या मऊ, बिहारच्या भागलपुर, दिल्लीच्या शकूरबस्ती आणि आनंद बिहार सारख्या स्टेशनवर तैनात केले होते. सोबतच काही ठिकाणी यांचा वापर सुद्धा झाला होता. परंतु त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात कोविड कोचचा वापर करण्यात आला नव्हता.