‘मुंबई – नाशिक – नागपूर’ आणि ‘मुंबई – पुणे – हैदराबाद’ सह देशातील ‘या’ 6 मार्गांवर धावणार ‘बुलेट’ ट्रेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले की रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी 6 सेक्शन निवडले आहेत ज्याची विस्तृत योजना एक वर्षात तयार केली आहे. मुंबई – अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडोरवर पहिल्यापासून निर्णयावर काम सुरु आहे. हाय स्पीड कॉरिडोरवर रेल्वे 300 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने धावेल तर सेमी हायस्पीड कॉरिडोरवर रेल्वे 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावेल.

या मार्गावर धावनार बुलेट ट्रेन –
अर्थसंकल्पापूर्वी यादव यांनी सांगितले की या 6 कॉरिडोरमध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (865 किलोमीटर) आणि दिल्ली – जयपूर – उदयपूर – अहमदाबाद (886 किलोमीटर) सेक्शनचा समावेश आहे. इतर कॉरिडोरमध्ये मुंबई – नाशिक – नागपूर (753 किलोमीटर), मुंबई – पुणे – हैदराबाद (711 किलोमीटर), चेन्नई –  बंगळुरू – मैसूर (435 किलोमीटर) आणि दिल्ली – चंदीगड – लुधियाना – जालंधर – अमृतसर (459 किलोमीटर) या मार्गांचा समावेश आहे.

वर्षभरात डीपीआर तयार –
यादव म्हणाले की, आम्ही या 6 कॉरिडोरची निवड केली आहे आणि त्याचा डीपीआर वर्षभरात तयार होईल. डीपीआरमध्ये या मार्गांच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला जाईल ज्यात जमिनीची उपलब्धता तसेच दळणवळणाची क्षमता इत्यादीचा समावेश आहे. या सर्वाच्या अभ्यासानंतर आम्ही निर्णय घेऊ की हायस्पीड असेल की सेमी हायस्पीड.

बुलेट ट्रेनची योजना 2023 पर्यंत पूर्ण होईल –
ते म्हणाले की देशातील पहिला हायस्पीड कॉरिडॉर मुंबई – अहमदाबादची बुलेट ट्रेन योजना डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. यादव यांनी असेही सांगितले की बुलेट ट्रेन योजनेसाठी जमीन अधिग्रहणाचे 90 टक्के काम पुढील महिन्यात पूर्ण होईल. आम्हाला या प्रकल्पासाठी 1380 हेक्टरची जमीन आवश्यक आहे. यातील 1005 हेक्टर जमीन खासगी आहे. या खासगी जमिनीमधील 471 हेक्टर जमीन आम्ही अधिग्रहण केली आहे, जर 149 हेक्टर सरकारी जमीनमध्ये 119 हेक्टरचे अधिग्रहण केले आहे. बाकी 128 हेक्टर जमीन रेल्वेची आहे जी प्रकल्पाला दिली गेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा