गाडी सुटण्यापूर्वी २० मिनिटं अगोदर पोहचा अन्यथा गाडी सोडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने कॅशलेस तिकीटाला प्रोत्साहान देण्यापाठोपाठ आता रेल्वे स्थानकांची देखील काडेकोट सुरक्षा करण्याची  योजना आखली आहे. या योजने नुसार प्रवाशांना आता आपली गाडी पकडण्यासाठी १५ ते २० मिनिटं आधीच रेल्वे स्थानकावर यावं लागणार आहे. सुरक्षेबाबदचे सर्व टप्पे पार केल्यानंतरच प्रवाशांना स्थानकात प्रवेश मिळेल गाडी पकडण्यास उशीर झाल्यास गाडी सोडावी लागणार आहे.
ही योजना कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात अली असून अलाहाबाद रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अशी कडक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे. अलाहाबाद पाठोपाठ कर्नाटकातील हुबळी स्थानकावरही अशाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात अली आहे. त्याचबरोबर देशातील आणखी २०२ रेल्वे स्थानकांमध्ये अशी सुरक्षा व्यवस्था अंमलात आणण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली. रेल्वे स्थानक सर्वबाजूंनी सुरक्षित केले जाईल. तसेच स्थानकाची प्रवेशद्वारे किती आहेत आणि त्यातील किती प्रवेशद्वार बंद करता येतील, हे पूर्ण पडताळले जाईल. प्रवेशद्वारांवर देखील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात केले जातील.
ज्या २०२ रेल्वे स्थानकांवर सुरक्षेची योजना करण्यात येणार आहे, त्याठिकाणी इंटिग्रेटेड सेक्युरिटी सिस्टीम (ISS) ही यंत्रणा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ISS या सुरक्षा यंत्रणेत सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्क्रिनिंग, बॉम्ब शोधक आणि नाशक यंत्रणा अशा सर्वांचा समावेश आहे. या सुरक्षेदरम्यान एखादा गुन्हेगार आढळून आल्यास यंत्रणा तात्काळ अलर्ट होतील,अशी माहिती देखील अरुण कुमार यांनी यावेळी बोलतांना दिली.