रेल्वे अधिकाऱ्याचा असाही विक्रम चक्क ; नादुरुस्त रेल्वे चालविली २०० किमी

जमशेदपूर : वृत्तसंस्था – मुंबईहून हावडाला जाणाऱ्या सुपरफस्ट एक्सप्रेसच्या थर्ड एसी कोचची चाके नादुरुस्त असल्याचे समजल्यानंतरही अशी नादुरुस्त एक्सप्रेस चक्क २०० किमी तशीच चालवून रेल्वे अधिकाऱ्यानी एक नवा विक्रम स्थापीत केला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा प्रश्न निर्माण झाला होता. प्रवाशांनी डब्यात खूप हादरे बसतात, अशी तक्रार करुनही त्याचकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. अधिकाऱ्यांचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला आहे.

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटलेली हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस टाटानगर स्थानकावर आली असता थर्ड एसी डब्यातील प्रवाशांनी सततच्या मोठ्या आवाजामुळे त्रस्त झाल्याने गोंधळ घातला. मात्र, तो डबा न बदलताच ही रेल्वे हावडापर्यंत चालविण्यात आली. हे अंतर २०० किमी आहे. केवळ रेल्वे चालकाला वेग कमी ठेवण्यास सांगण्यात आले.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनुसार सीएसएमटीहून सुटल्यानंतर एक्स्प्रेस सोमवारी २ वाजून ५५ मिनिटांनी टाटानगरला पोहोचायला हवी होती. मात्र, ही ट्रेन दहा तास उशिराने पोहोचली. ही ट्रेन वेगात महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाड झाल्याची माहिती चक्रधरपूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. यावेळी थर्ड एसीच्या बी १ कोचच्या चाकामध्ये गडबड असल्याचे समजू शकले आणि ट्रेन कधीही रुळांवरून घसरू शकते. यानंतर लगेचच टाटानगरच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. दुरुस्त करणारे कर्मचारी टाटानगरलाला ट्रेन पोहोचायच्या आत पोहोचले होते.

तपासणीनंतर कोचला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामध्ये ४५ मिनिटे गेली. यावेळी टाटानगरला येणारी इतर ट्रेन बाजुला थांबविण्यात आली होती. ही संख्या वाढत होती. याचा दबावही रेल्वे अधिकाºयांवर होता. यामुळे हावडा ट्रेनला नादुरुस्त चाकावरच हावड्याला पाठविण्यात आले. हे समजल्यानंतर कोचमधील प्रवाशांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. मात्र, रेल्वेने त्यांच्या सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.

Loading...
You might also like