Railway Recruitment 2021 : रेल्वेमध्ये दहावी पास भरती; परीक्षेशिवाय मिळेल नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर मध्य रेल्वे भरती 2021: रेल्वेमध्ये ऍप्रेंटिस पदांच्या नोकरीसाठी अर्ज करण्याची उत्तम संधी आहे. उत्तर मध्य रेल्वेने उत्तर प्रदेशच्या झांसी शहरातील विविध ट्रेंडमधील एकूण ४८० ऍप्रेंटिस पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १७ मार्च २०२१ पासून सुरु झाली आहे.

North Central Railway Recrutment 2021 : तपशील
पदांच्या माहिती अधिसूचनेनुसार उत्तर मध्य रेल्वेमध्ये या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, मॅकेनिक, कार्पेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशी एकूण ४८० पदे नियुक्त केली जातील.

NCR Apprentice 2021: शैक्षणिक पात्रता
रेल्वेमध्ये ऍप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी. यासह संबंधित ट्रेंडमध्ये iti सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

North Central Railway Jobs : वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १५ वर्ष तर जास्तीत जास्त २४ वर्षे निश्चित केली गेली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियमानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.

NCR Apprentice Recruitment : प्रवेश फी
सर्वसाधारण आणि सामान्य गटातील उमेदवारांना १७० रुपये फी भरावी लागेल. अनुसूचित जाती /जमाती आणि महिला उमेदवारांना केवळ ७० रुपये फी आहे.

North Central Railway Apprentice Selection Process : निवड प्रक्रिया
या पदांवर नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या लेखी परीक्षा आणि मुलाखत देण्याची गरज नाही, परंतू दहावीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे त्यांची निवड केली जाईल.

How to Apply for Job: अर्ज कसा करावा ?
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना mponline.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. याशिवाय तुम्ही उत्तर मध्य रेल्वेच्या वेबसाईटवर ncr.indianrailways.gov.in वर भरती विभागात दिलेल्या लिंकला भेट देऊ शकता.