रेल्वेनं राजधानी-शताब्दीसह अनेक ट्रेनच्या वेळेत केला बदल; इथं चेक करा नवे ‘टाइम टेबल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेस्टर्न रेल्वे झोनने आगामी 1 डिसेंबरपासून ट्रेन टायमिंगमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतून निघणार्‍या राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनची वेळ बदलण्यात आली आहे. मुंबई सेंट्रलहून नई दिल्ली राजधानी आता 1 डिसेंबरनंतर बोरिवलीमध्येसुद्धा थांबेल, तर दुसरीकडे ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस आता अंधरी स्टेशनवर थांबणार नाही. याशिवाय वेस्टर्न रेल्वे झोनच्या अन्य ट्रेनच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

1. ट्रेन क्रमांक 02951/02952 मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली राजधानी स्पेशल एक्स्प्रेस (दररोज)
मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी स्पेशल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक 02951 डिसेंबर 2020 पासून सायंकाळी 5 वाजता सुटेल. पूर्वी ती 05:30 वाजता सुटत होती. आता ही ट्रेन बोरिवली स्थानकातही थांबेल. मुंबई सेंट्रल येथून धावणारी ही ट्रेन बोरिवली, सुरत, वडोदरा, रतलाम आणि कोटा येथे थांबेल. ही ट्रेन राजधानी दिल्लीत सकाळी 08:32 वाजता पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 02952 ही नवी दिल्ली ते मुंबईदरम्यान संध्याकाळी 16:55 वाजता धावेल. सुधारित वेळेनुसार ही ट्रेन कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत आणि बोरिवली येथे थांबेल. सकाळी 08:35 वाजता ही ट्रेन मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

2. ट्रेन क्रमांक 02953/02954 मुंबई सेंट्रल – हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी विशेष एक्स्प्रेस (दररोज)
मुंबई सेंट्रलहून हजरत निजामुद्दीनसाठी 02953 ही गाडी आता अर्धा तास आधी म्हणजे सायंकाळी 05:10 सुटेल. 1 डिसेंबरपासून ही गाडी अंधेरी स्थानकात थांबणार नाही. मुंबई सेंट्रल येथून सुटल्यानंतर बोरिवली, वापी, वलसाड, सूरत, भरुच, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर आणि मथुरा मार्गे ही गाडी हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहाेचेल. ही ट्रेन सकाळी 09:43 वाजता पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 02954 हजरत निजामुद्दीन येथून सायंकाळी 05.:15 वाजता सुटेल आणि मथुरा, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वलसाड, वापी आणि बोरिवली येथे थांबेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 10:05 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

3. ट्रेन क्रमांक 02009/02010 मुंबई सेंट्रल – अहमदाबाद शताब्दी स्पेशल एक्स्प्रेस (आठवड्यातून 6 दिवस)
मुंबई सेंट्रल ते अहमदाबादपर्यंत धावणारी ही शताब्दी स्पेशल एक्स्प्रेस ट्रेन 02009 आता 1 डिसेंबरपासून 06:40 वाजता सुटेल. ही ट्रेन बोरिवली, वापी, सूरत, भरुच, वडोदरा, आनंद आणि नाडियाद मार्गे दुपारी 1 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीला 02010 ही ट्रेन अहमदाबाद येथून 02:40 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला रात्री 09:20 वाजता पोहोचेल.

4. ट्रेन क्रमांक 02244/02243 वांद्रे टर्मिनस – कानपूर सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल (दररोज)
ट्रेन नंबर 02244 सुपरफास्ट स्पेशल ही गाडी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 05:10 कानपूरसाठी सुटेल. बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोधरा जंक्शन, रतलाम, नागदा मार्गे दुसर्‍या दिवशी सकाळी 07:15 वाजता पोहाेचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 02243 ही कानपूर सेंट्रल येथून सायंकाळी 06:25 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी सायंकाळी 08:55 वाजता वांद्रेला पोहोचेल.

5. ट्रेन क्रमांक 02248/02247 सबरमती – ग्वाल्हेर सुपरफास्ट स्पेशल (आठवड्यातून तीन दिवस)
02248 ही गाडी साबरमती येथून सायंकाळी 04:50 वाजता सुटेल आणि मेहसाना व पालनपूरमार्गे सकाळी 09:25 वाजता ग्वाल्हेरला पोहोचेल. पूर्वी ही ट्रेन अहमदाबाद येथून चालत असे, परंतु आता ती साबरमती येथून धावेल. त्याचप्रमाणे ही ट्रेन ग्वाल्हेरहून परत रात्री 08.10 वाजता सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी 11:50 वाजता साबरमतीला पोहोचेल.

6. ट्रेन क्रमांक 02548/02547 साबरमती – आगरा कॅन्ट सुपरफास्ट स्पेशल (आठवड्यातून 4 दिवस)
29 नोव्हेंबरपासून ही ट्रेन अहमदाबादऐवजी साबरमती येथून धावेल. 02548 ही गाडी साबरमती येथून सायंकाळी 04:50 वाजता साबरमती येथून सुटेल. मेहसाना व पालनपूरमार्गे दुसर्‍या दिवशी सकाळी 07:15 वाजता आगरा येथे पोहोचेल. अशाप्रकारे ही गाडी आगरा कँट येथून रात्री 10:10 मिनिटांनी सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी 11:50 वाजता साबरमतीला पोहोचेल.

7. ट्रेन क्रमांक 01104/01103 वांद्रे टर्मिन – झांसी सुपरफास्ट स्पेशल (आठवड्यातून दोन दिवस)
01104 ही गाडी वांद्रे टर्मिनसहून झांसीसाठी पहाटे 05:10 वाजता सुटेल. बोरिवली, वापी, सुरत, भरुच, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जैन आणि माक्सी मार्गे पहाटे पाच वाजता ही ट्रेन झांसी येथे दाखल होईल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 01103 झांसी येथून सायंकाळी 4.50 वाजता सुटेल. दुसर्‍या दिवशी दुपारी 4 वाजता वांद्रे येथे पोहाेचेल.

8. ट्रेन नंबर 04189/04190 दौंड – ग्वाल्हेर सुपरफास्ट स्पेशल (दररोज)
ट्रेन नंबर 024189 दौंडहून रात्री 11:10 मिनिटांनी सुटेल आणि वसई, बोईसार, वापी, वलसाड़, सूरत, भरुच, वडोदरा आणि गोध्राहून दुपारी 01:10 वाजता ग्वाल्हेरला पोहाेचेल. अशाच प्रकारे परतीसाठी ट्रेन नंबर 04190 ग्वाल्हेरहून सायंकाळी 05:15 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6:20 मिनिटांनी दौंडला पोहाेचेल.