10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 313 जागांसाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने मल्टी टास्किंग स्टाफ, एमटीएस (MTS) पदांसाठी भरती सुुरु केली आहे. ही भरती एकूण 118 पदांसाठी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे, याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर असणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासाठीची आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार rrcnr.org किंवा indianrailways.gov.in या आधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. ही अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे.

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परिक्षा पास व्हावे लागेल. यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल. या पदांवर अर्ज करणाऱ्यांचे वय 18 ते 33 वर्ष असणे आवश्यक आहे. वयाची गणना 1 जानेवारी 2020 पर्यंत असेल. साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने 313 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. सेंट्रल रेल्वेने ही भरती 10 पास उमेदवारांसाठी केली आहे.

शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार मान्यता पात्र संस्थेतून 10 वी पास हवेत. तसेच त्यांनी विविध पदांनुसार डिप्लोमा केलेला असावा.

असा करा अर्ज –

1. उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी आधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जावे.
2. होमपेजवर असलेल्या लिंकवर क्लिक करुन next टॅब वर क्लिक करावे.
3. येथे ‘I have read the notification’ वर क्लिक करावे.
4. अर्जदाराला आता माहिती भरुन रजिस्ट्रेशन करावे लागले.
5. त्यानंतर फॉर्म भरावा आणि फोटो, स्वाक्षरी अपलोड करावी.
6. ऑनलाइन शुल्क भरता येईल.

केव्हा होणार परिक्षा –
नोटिफिकेशनच्या मते, 13 ऑक्टोबरला परिक्षा आयोजित करण्यात आली आहे.

Visit : policenama.com