Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस पुण्यात मुसळधार; 15 जिल्ह्यांना आज ‘Alert’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Rain in Maharashtra | राज्यात अनेक भागात गेल्या पाच दिवसापासुन जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी तुरळक पाऊसाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) पुन्हा एकदा मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालंय. मराठवाड्यात (Marathwada) देखील अनेक भागात पावसाने धुमाकुळ घातला आहे. तशीच पावसाची स्थिती आज देखील कायम आहे. मात्र, असं असतानाही मागील पाच दिवस पुण्यात (Pune) पाऊसाने दडी मारली आहे. आता उद्यापासुन आगामी 4 दिवस पुण्यात पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे. (Chance of torrential rain for next 4 days)

मागील 4-5 दिवसांपासून राज्यात (Rain in Maharashtra) पावसाला सुरुवात झाली असली, तरी पुण्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी रिमझिम आणि हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. आज देखील पुण्यामध्ये अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून पुणे जिल्ह्यांत आगामी 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याकडुन पुढचे ४ दिवस पुण्यात येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांना हवामान खात्यानं (Meteorological Department) हाय अलर्ट (Hi alert) जारी केला आहे.
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, अकोला,
यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर अशा एकूण पंधरा जिल्ह्यांना आज हवामान खात्यानं येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे.

आगामी 5 दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.
दरम्यान, पूर्व महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस सरकणार आहे.
तर 6 आणि 7 सप्टेंबर रोजी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
6 सप्टेंबर रोजी रायगड आणि रत्नागिरी तर 7 सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.
तसेच पुढील 2 दिवसात कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Web Title : Rain in Maharashtra | 4 days heavy rainfall possible in pune from tomorrow imd give yellow alerts to 15 districts for today

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 244 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sangli Crime | धडक करावाई ! नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांचा छापा

Medha Kulkarni | अव्दितीय अन् अलौकिक ! मेधा कुलकर्णींनी घेतली पंतप्रधानांची भेट, PM मोदींना राखी बांधुन केली ‘ही’ विनंती