Rain in Maharashtra | मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात ‘कोसळधार’ पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain in Maharashtra) पुन्हा कमबॅक केले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण पट्ट्यात, गोवा (Goa), मध्य महाराष्ट, गुजरात (Gujarat), राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, ओडीशा (Odisha) इत्यादी भागासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे आहेत. या भागात पुढील पाच दिवस अती तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे.

तसेच मध्य महाराष्ट्राला (Madhya Maharashtra) 13 सप्टेंबर आणि कोकण (Kokan), गोव्यामध्ये 13 आणि 14 तारखेला अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर सायक्लॉन (Cyclone) सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ उत्तर-पश्चिमचे दिशेने सरकत आहे. त्यामुळे ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी पुढील 48 तासांत हे वारे आदळण्याची शक्यता आहे. हे वारे पुढील तीन दिवसांमध्ये ओडीशावरुन छत्तीसगडच्या (Chhattisgarh) दिशेने जातील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राजधानी दिल्लात पावसाचे थैमान

देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Capital Delhi) रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दशकभरापासूनचा हा सर्वाधिक पाऊस आहे. त्यामुळे दिल्लीत ठिकाठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरुप आले आहे. विमानतळावरदेखील रनवेसह परिसरात पाणी साठले आहे. या ठिकाणचे पाणी पाहून हे दिल्ली विमानतळ (Delhi Airport) आहे यावर विश्वासच बसत नाही. दिल्ली विमानतळावर येणारी विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आहेत. गेल्या 24 तासात 97 मिलीमीटर पाऊस झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून आणखी काही तासात असाच पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Web Titel :- Rain in Maharashtra | extremely heavy falls madhya maharashtra 13th and konkan goa during 13th 14th september

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhandara News | दुर्देवी ! गाय वाचवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

APL Apollo Tubes | 480 रुपयांचा शेयर झाला 1880 रुपयांचा, 1 वर्षात या शेयने दिला 260% चा रिटर्न, तुम्ही करू शकता का यामध्ये गुंतवणूक?

Crude Palm Oil | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; मोदी सरकारने केली आयात शुल्कात मोठी कपात